शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

जानेवारीत दुसऱ्यांदा आली आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या, चंद्रोदयाची वेळ आणि व्रताची महती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 30, 2021 18:45 IST

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याची उपासना म्हणून अनेक जण कळत्या वयापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपास भक्तीभावाने करतात. गणपतीची पूजा अर्चा करून, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती म्हणून, मोदकांचा नैवेद्य दाखवून उपास सोडतात. 

यंदा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २ जानेवारीला संकष्टी चतुर्थी होती आणि आता वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीला अर्थात ३१ जानेवारीला पुन्हा संकष्टी चतुर्थी आली आहे. महिन्यातून दोनदा चतुर्थी क्वचितच येते. ही स्थिती तिथींचा क्षय झाल्यामुळे येते. याचा परिणाम असा, की फेब्रुवारी महिन्यात एकही संकष्टी येणार नसून थेट २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी येणार आहे. दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जन्म असणार आहे. 

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याची उपासना म्हणून अनेक जण कळत्या वयापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपास भक्तीभावाने करतात. गणपतीची पूजा अर्चा करून, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती म्हणून, मोदकांचा नैवेद्य दाखवून उपास सोडतात. 

पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळकुटा चतुर्थीदेखील म्हटले जाते. याच मासात मकरसंक्रांतीचा उत्सव असल्याने रथसप्तमीपर्यंत तीळगुळाला विशेष महत्त्व असते. म्हणून संकष्टीच्या नैवेद्याला बाप्पाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच या निमित्ताने तीळ गुळाचे दानही केले जाते. 

संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे आगळे वेगळे महत्त्व आहे.

  • मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी अनेक पालक संकष्टीचे व्रत करतात. एवढेच काय, तर खुद्द यशोदा मय्याने कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्यात म्हणून संकष्टीचे व्रत केले होते.
  • गणपती हा मंगलमूर्ती आहे. म्हणून त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे अमंगल होत नाही, अशी धारणा आहे. 
  • भावभक्तीने हे व्रत केल्यामुळे ग्रहदशा सुधारते व अनिष्ट ग्रहस्थिती असल्यास बाप्पाच्या कृपाशिर्वादाचे पाठबळ मिळते.
  • संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे घरात मंगलमय वातावरण राहते. तसेच मंगल कार्यांना गती मिळते. 

संकष्टी चतुर्थीची पूजा विधी

  • ३१ जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. 
  • अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
  • रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि धूप दीप लावून गणपतीच्या मूर्तीसमोर नैवेद्य आणि पाण्याचा पेला ठेवावा.
  • चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाचे फुलं आणि दूर्वा वाहून उपास सोडावा.

संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ 

मुंबई  २१.०४              सोलापूर २०.५३ठाणे २१.०३                नागपूर २०.३६पुणे २१.००                 अमरावती २०.४२रत्नागिरी २१.०४          अकोला २०.४६कोल्हापूर २१.००        औरंगाबाद २०.५३सातार २१.००              भुसावळ २०.५०नाशिक २१.००            परभणी २०.४८अहमदनगर २०.५६     नांदेड २०.४५पणजी २१. ०३             उस्मानाबाद २०.५२धुळे २०.५५                 भंडारा २०.३४जळगाव २०.५१            चंद्रपूर २०.३७वर्धा २०.३९                   बुलढाणा २०.४९यवतमाळ २०.४१          इंदौर २०.४९बीड २०.५२                  ग्वाल्हेर २०.३६सांगली २०.५९              बेळगाव २१.००सावंतवाडी २१.०३         मालवण २१.०४