शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संत श्री रविदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 10:45 IST

साधु संतांची जात विचारु नये तर त्यांचे ज्ञान जाणावे.

  पंधराव्या शतकात राजस्थान मध्ये अवतार कार्य करणारे महान संत रविदास यांची आज पुण्यतिथी. संतश्रेष्ठ मीरा व महान योध्दा व श्रेष्ठ राजा राणा सांगाचे गुरु हे संत रविदास होते. संत कबीरजी म्हणतात,  जाती न पुछो साधु की, पुछो साधु का ज्ञान. साधु संतांची जात विचारु नये तर त्यांचे ज्ञान जाणावे. आधी असा काळ होता की  अमुक साधु, अमुक संत हे  कोण्या जातीचे आहेत असे विचारले  जात होते. त्यावरच कबीरजींचा दोहा आहे. मात्र आता हा काळ वेगळाच आला आहे. खरे तर कलियुग प्रभावाने जाती विहिनतेचा प्रभाव येणे सुरुच झाले होते. मात्र वर्तमान राजनैतिक प्रभावाने आम्ही या संताचे जातीचे आहेात अशी मनुष्यात प्रौढी आली आहे.             संत रविदासांची अभंगवाणी भारतभर प्रसिध्द आहे, त्यांचा हा बोधप्रद दोहा आहे.

       म्रिग मीन भ्रिंग पतंग कुंजर एक दोख बिनास ॥        पंच दोख असाध जा महि ता की केतक आस         माधो अबिदिआ हित कीन ॥         बिबेक दीप मलीन ॥१॥ 

              मृग हरिण, मीन अर्थात मासा, भ्रिंग अर्थात भुंगा, पंतग कीडा व कुंजर म्हणजे हत्ती हे पांच प्राणी पांच विकाराने बाधीत आहेत. जसे मृग हरिण ध्वनी श्रवण विकाराने. असे म्हणतात, पुर्वी हरिण पकडणारे विशिष्ट मधुर ध्वनी काढायचे. त्या ध्वनीला मोहित होऊन हरिण ध्वनीचे दिशेने धावत यायचे. त्यावेळी शिकारी त्याला पकडायचे. मासा हा खाद्याचे लोभात आमिषाला बळी पडून काटयात अडकतो, भुंगा हा फुलाचा गंध घेतो, गंध विषयात गुंततो.त्यामुळे तो कमळ फुलांत अडकून पडतो. पतंग हा रात्री दुृष्टीने प्रकाश पाहून दिव्यावर झडप घेऊन मृत्युमुखी पडतो, तर हत्ती हा कामुकतेत वेडा होतो. श्रवण, गंध, रस, रुप व स्पर्श हे पाच विषय आहेत. संत रविदास म्हणतात, हे पंच गुण वरील पशु मध्ये तर एक एकच आहे, ज्यापायी त्यांचा नाश होतो. पण मनुष्यामध्ये तर हे पांचही इंद्रिय विकार आहेत. तेव्हा अशा असाध्य विषयांपासून मनुष्याचे जीवनाची आस कशी सुरक्षित, जीवनाविषयीचा बोध कसा सुरक्षीत असेल ?  रविदास म्हणतात, देवा या  अविधि जगण्याने कोणाचे हित झाले ?  विधी म्हणजे परमेश्वराचा कायदा समजणे, परमेश्वराचे कार्य समजणे. त्याला समजून जगणे  ही विधी व त्याला न समजणे ही अविधी. त्यातही मनुष्याचा विवेक दीप मलीन असेल, तर हा विधी समजणे नाही. विवेकाचे प्रकाशातच विधीचे ज्ञान आहे. विवेकाचे जगणेच मनुष्याला कळले नाही  तर मग  बोधाची आशाच नाही राहिली. जीवनात मग अंधार आहे, अधःपातच आहे.                    त्रिगद जोनि अचेत समभव पुंन पाप असोच ॥                मानुखा अवतार दुलभ तिही संगति पोच ॥२॥               जीअ जंत जहा जहा लगु करम के बसि जाइ ॥                काल फास अबध लागे कछु न चलै उपाइ ॥३॥

 मनुष्य योनी सोडून उर्वरित त्रिगद जोनि म्हणजे तीन प्रकारच्या योनी, त्या म्हणजे पशु, पक्षी व जीवजंतु ह्या अबोध आहेत, अचेत आहेत. त्यांचेत पुण्य व पाप काय त्याची जाणीव त्यांना नाही. माणूस जन्म, माणसाचा अवतार हा दुर्लभ आहे. त्याचेकडे बोध क्षमता आहे. तरीही  पशुपक्षी वा जीवजंतु प्रमाणे तोही पाप पुण्याविषयी फार सोच ठेवीत नाही , फार सचेत असत नाही.जीव जंतु कर्म करीत राहतात व काळाचा फाॅंस त्यांचे गळयात अबध, अवश्य पडत राहतो.  ज्याचा काही उपाय नाही.

     रविदास दास उदास तजु भ्रमु तपन तपु गुर गिआन ॥      भगत जन भै हरन परमानंद करहु निदान ॥४॥

               संत रविदास उदास चित्ताने अर्थात वैराग्य भावाने उपदेश करतात की,  मनुष्याने सांसारिक भ्रम  जाणावा. हे जाणणे म्हणजे तप आहे. या तपाला श्रेष्ठता येते ती गुरुंचे ज्ञानाने. म्हणून सदगुरुला शरण जावे.               शेवटी रविदास म्हणतात,  कर्माचा फास जो पशु पक्षी वा जीव जंतु यांचे प्रमाणे  माणसाचेही गळ्यात पडतो, त्याचे निदान, त्याचा उपाय म्हणजे भक्त जनांचे भय हरण करणारा परमानंद आहे. ज्याची प्राप्ती गुरुज्ञानामध्ये आहे 

महान संत रविदास यांचे पुण्यस्मरण दिनी त्यांना श्रध्दा नमन !                                         

- शं.ना.बेंडे पाटील अकोला

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक