शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

'ही' कविता नित्यकर्मातील पूजेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 08:00 IST

नुसते विधी केले म्हणजे पूजा होत नाही, तर त्यात समर्पण भावनाही महत्त्वाची असते.

समाजमाध्यमांचा फायदा आहे तसा तोटाही. रोज डझनभर कृत्रिम फुलं आपल्या मोबाईल गॅलरीत येऊन बसतात. वरून गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि जेवण झालं का? वाल्या मेसेजचा तर रतिबच असतो. असे असूनही आजच्या काळात हे संपर्कांचे सर्वात प्रभावी माध्यम आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. याच माध्यमातून अनेक छान छान सुविचार वाचायला मिळतात. त्या विचारांनी कधी मूड तात्पुरता फ्रेश होतो, तर कधी सबंध दिवस छान जातो. यापलीकडे काही मेसेज चिंतन करायला भाग पाडतात, तर काही आपला दृष्टिकोन कायमस्वरूपी बदलून टाकतात. वानगीदाखल ही कविता पहा. कवीचे नाव माहीत नाही, परंतु साध्या शब्दात किती गहन अर्थ यात दिला आहे. देवपूजा हा आपल्या नित्यकर्माचा भाग, परंतु ही कविता पूजेचा दृष्टिकोनच बदलून टाकेल, हे नक्की!

माझी पूजा अपूर्ण आहे !

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही , तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो ! पण त्या पांढर्‍या  रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो ! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवाजवळ दिवा लावतो ! पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो ! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !पण त्या कापराच्या  वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत , तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !  पण माझ्या आजूबाजूच्या  माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही , तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो !पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक  निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो ! पण माझ्या कष्टसाध्य  सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही , तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो ! पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद  परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही , तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !