शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pitru Paksha 2021 : अविधवा नवमी श्राद्ध का? कोणासाठी? कसे? व कधी केले जाते, ते सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 12:31 IST

Pitru Paksha 2021 : ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली, तरीदेखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीदेखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे.

पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, त्या स्त्रिसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस पार्वणाविधीने अविधवानवमीश्राद्ध' करण्याविषयी शास्त्राज्ञा आहे. यावर्षी ही तिथी २९ सप्टेंबर रोजी अर्थात उद्या आहे. वाचूया सविस्तर माहिती. 

अवेहपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना 'सधवा' म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो, तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा 'सधवा' हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवानवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. 

Pitru paksha 2021 : वेळेअभावी श्राद्धविधी करणे शक्य नाही? मग या दहा उपायांपैकी एकाचा अवलंब करा!

जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल, तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवानवमीचे श्राद्ध, म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. मुलाची मुंज झालेली नसेल, तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत: करावे. 

अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत :

या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेवू घालतात. तिला सौभाग्य अलंकार देतात. यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात. तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात.

अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण :

साधारण पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो. मात्र, संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रिच्या इच्छा आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून राहते.  तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी, म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते. तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एकार्थी स्त्रिच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली, तरीदेखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीदेखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे. यातून लक्षात येते, की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे. त्यांना दुषणे देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृद्धींगत करण्यात धन्यता मानुया!

Pitru Paksha 2021 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष