शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

संत चोखामेळा पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या अभंगातून जाणून घेऊया त्यांनी दिलेले समाजभान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:00 IST

१७ मे रोजी संत चोखामेळा यांची पुण्यतिथि आहे, त्यानिमित्त त्यांच्या अभंगातून त्यांनी मांडलेलं सत्य आजच्या परिस्थितीलाही कसे लागू पडते ते पहा!

समाज माध्यमावरील आपला वावर वाढल्यापासून एक आभासी जगत तयार झाले आहे. तिथे प्रत्येक व्यक्ती केवळ आनंदात आहे असे वाटते किंवा भासवते. दुसऱ्याला पाहून आपण आपली परिस्थिती ताडून पाहतो आणि अपेक्षाभंग होताच दु:खी होतो. वरवर छान दिसणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगात डोकावून पाहिले असता, वेगळीच परिस्थिती नजरेस पडते. मग, केवळ चकचकीत आवेष्टनावर विश्वास ठेवायचा, की सत्यपरिस्थितीदेखील डोळसपणे पाहायची, हे आपण ठरवायचे. सुंदर आवेष्टनाअभावी आज अनेक आयुष्य धुळीत पडलेली आहेत. त्यांचे महत्त्व जाणून घेत, त्यांना कोंदण मिळवून देणे, ही आपली जबाबदारी आहे. आज संत चोखामेळा यांची पुण्यतिथि, त्यानिमित्त त्यांनी अभंगातून मांडलेल्या विचारांचा आढावा घेऊया.

चोखामेळा हे ज्ञानदेवकालीन संत मूळचे मंगळवेढ्याचे. पण त्यांचे वास्तव्य बराच काळ पंढरपूरला होते. संत नामदेवांनी त्यांना मंत्रोपदेश दिला होता. त्यांच्या घरची सगळी मंडळी विठ्ठलभक्तीत एकरूप झाली होती. त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मुलगा कर्ममेळा, मेहुणा बंका व स्वत: चोखामेळा या सर्वांची अभंगरचना उपलब्ध आहे. मंगळवेढ्यास गावकूस बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी बहुजनांना वेठीला धरले. बांधकाम चालू असताना कूस कोसळले. इतर बांधवांबरोबर चोखोबांचेही निर्वाण झाले. त्यांच्या अस्थी तिथुन आणून नामदेवांनी पंढरीस महाद्वारासमोर चोखोबांची समाधी बांधली. 

माणसा माणसांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असे जे भेद भासतात, ते वरवरचे असतात. भक्तीला जात नसते, पण चोखटपणाने वागूनही  चोखोबांना उपेक्षा होत होती. ती सल व्यक्त करताना चोखामेळा म्हणतात, 

ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।कमान डोंगी परी, तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।नदी डोंगी परी, जल नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा।चोखा डोंगा परी, भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।

ऊस वेडावाकडा वाढला असेल. त्याची सगळी कांडं सरळ, एका रेषेत नसतीलही, पण त्याचा रस मात्र त्याच्यासारखाच डोंगा म्हणजे वाकडा नसतो. उसाचा रस गोडच असतो. त्यामुळे उसाच्या बाहेरील रंगाला विंâवा आकाराला महत्त्व नाही. धनुष्याची कमान वाकडी असली, तरी त्याला लावलेला बाण वाकडा नसतो. तो अगदी सरळ असतो. मग कमानीला नाव ठेवून काय उपयोग? नदीला वळण नसते. तिचा प्रवाह वाकड्या रेषेत जात असतो. परंतु, नदीचे पाणी स्वच्छ व मधुर असते. नदीचे वळण आणि पाण्याची गोडी यांचा परस्परसंबंध नसतो. चोखोबांना तुम्ही एक वेळ कमी समजालही, परंतु त्यांची भक्ती श्रेष्ठ आहे. तो भाव अस्सल आहे. 

गावगाड्यात आणि शहरात आजही स्पृश्याअस्पृश्यता पाळली जाते. गावकुसाबाहेर बहुजनांची वस्ती असते. चोखामेळा त्या समाजाचे शल्य मांडतात. त्यांच्या नावातील योगायोग पहा- चोख म्हणजे स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि मेळा म्हणजे मलीन. या दोन्ही गोष्टी एका नावातच नाही, तर एका देहातही एकवटल्या आहेत. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, या शब्दातील वेदना, आर्त भाव आणि सच्ची ईश्वरभक्ती प्रगट होते. चोख-निर्मळ असूनही जातीव्यवस्थेत भरडल्या गेलेल्या संत चोखामेळ्यांचे आयुष्य लौकीकार्थाने उपेक्षित राहीले, परंतु पारमार्थिक अर्थाने, त्यांनी भगवंताला केव्हाच आपलेसे करून घेतले. भक्तीनिष्ठेच्या बळावर चोखोबांनी जशी आयुष्याची उंची वाढवत नेली, तशी आपणही आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर स्वत:चे नाव, ओळख कमावू शकतो. त्यासाठी फक्त स्वत:चा आत्मविश्वास ठाम असायला हवा.