शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 10, 2020 16:42 IST

ज्याचे हृदय प्रेमाने सदैव भरलेले असते, तीच व्यक्ती जगाला प्रेमाचा संदेश देऊ शकते.

ठळक मुद्देसर्व काही चित्तवृत्तीवर अवलंबून असते. ती जोपर्यंत शांत असते, तोपर्यंत बाहेरील विषम स्थितीचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही.

ज्योत्स्ना गाडगीळ 

भगवान गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना, विश्वाला प्रेम, दया आणि शांतीचा संदेश द्यायला सांगितला. 

गौतम बुद्धांचे असंख्य शिष्य होते. त्यापैकी एक होता, 'पूर्णा.' त्याची साधना पूर्ण झाली होती. म्हणून तो बुद्धांना म्हणाला, 'भगवान, आता आपण मला अनुज्ञा द्या. मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे.'

भगवान म्हणाले, 'ठीक आहे. माझी अनुज्ञा आहे. परंतु मला अगोदर सांग, तू कुठे जाणार आहेस?'

हेही वाचा: खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

पूर्णा म्हणाला, 'भगवान, बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे. जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्खू गेलला नाही आणि तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही. म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली.'

भगवान म्हणाले, 'अरे, तिकडे कोणीही भिक्खू गेला नाही, याला कारण आहे. तिथले लोक फार वाईट आहेत म्हणे! तू तिथे गेलास, तर कदाचित ते तुझा अपमान करतील, मग तू काय करणार?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी नुसता अपमानच केला. शिव्या वगैरे दिल्या, पण मारले तर नाही ना.'

भगवान म्हणाले, 'समजा, एखाद्याने तुला खरोखरच मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, तरीही मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी मला नुसते मारले, जीव तर नाही घेतला.'

भगवान म्हणाले, 'तुला आता आणखी एक, शेवटचा प्रश्न विचारतो. समजा, त्यांपैकी एकाने तुला जिवे मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन. कारण, त्यांनी मला जीवनमुक्ती दिली. नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहवूâन गेलो असतो.'

यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले, 'पूर्णा, तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास. आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करू शकतोस. कारण, तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील. ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही.'

भगवान महावीरांच्या बाबतीत असे सांगतात, की ते काट्यावरूनही अनवाणी चालू शकत असत. कारण, ते चालताना काटे आपली वर असलेली टोके खाली करत असत. महंमद पैगंबरांच्या बाबतीतही म्हटले जाते, वाळवंटातून प्रखर उन्हात चालत असताना त्यांच्या डोक्यावर नेहमी एक ढग सावली धरत असे. उलटे होणारे काटे व सावली धरणारा ढग यांच्यावर विश्वास ठेवणे कदाचित अवघड वाटेल. परंतु, एक मात्र नक्की, ज्याच्या मनात काटे नाहीत, त्याच्या पायांना काटे टोचणार नाहीत आणि ज्याच्या हृदयात जळणारी वासना नसेल, त्याला उन्हाच्या कडाक्यातही सर्वत्र सावली असल्याचा भास होईल. 

एकूणच काय, तर सर्व काही चित्तवृत्तीवर अवलंबून असते. ती जोपर्यंत शांत असते, तोपर्यंत बाहेरील विषम स्थितीचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही.

हेही वाचा: पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा