शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

OMG! पुढचे वर्ष ३६५ नव्हे तर ३६६ दिवसांचे; २०२४ मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ, विवाह मुहूर्त भरपूर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 28, 2023 13:27 IST

नूतन वर्षात एक दिवस अधिक, एकही ग्रहण दिसणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोमवारी १ जानेवारी रोजी नूतन वर्ष २०२४ चा प्रारंभ होत आहे. यावर्षी सन २०२३ मध्ये लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्षाचा प्रारंभ रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता होणार आहे. सन २०२४ हे लीप वर्ष असल्याने या वर्षात जास्त काम करण्यासाठी आपणासर्वांस एक दिवस जास्त मिळणार आहे. सन २०२४ मध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस असणार आहेत असे ज्येष्ठ पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

 सन २०२४ मध्ये (१) २५ मार्च रोजी छायाकल्प चंद्रग्रहण , (२) ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, (३) १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, (४) २ ॲाक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतू यापैकी एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर आणि १७ ॲाक्टोबर या दोन पौर्णिमांना सुपरमून ( चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित ) दिसणार आहेत.

२२ सुट्या इतरवारी...

सन २०२४ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी २ सुट्या रविवारी येणार आहेत. २२ सुट्या इतरवारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ होणार आहे. सन २०२४ मध्ये सोनेखरेदी करणारांसाठी २५ जानेवारी, २२ फेब्रुवारी, २६ सप्टेंबर, २४ ॲाक्टोबर आणि २१ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग येणार आहेत.

गणेश भक्तांसाठी...

गणेश भक्तांसाठी २५ जून रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी योग येणार आहे. विवाहेच्छुकांसाठी सन २०२४ मध्ये जानेवारीमध्ये १२, फेब्रुवारीमध्ये १३, मार्चमध्ये ८, एप्रिलमध्ये १०, मेमध्ये २ , जूनमध्ये २, जुलैमध्ये ६, नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ विवाह मुहूर्त दिले आहेत असे सोमण यांनी सांगितले.

टॅग्स :New Yearनववर्ष