शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आईचा विश्वास मुलांच्या पंखाना बळ देतो; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 08:00 IST

आई ही आपला पहिला गुरु असते. तिच्यावर नितांत श्रद्धा ठेवा आणि तिचे उपकार कधीच विसरू नका...!

'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' असे म्हटले जाते, म्हणूनच पूजेतही 'मातृदेवो भव' असे म्हणत आईला पहिला नमस्कार केला जातो. ती आपल्याला वाढवते, पालन पोषण करते, पण या पलीकडे आपल्या चिमुकल्या पंखात बळ भरून ती गरुडभरारी घ्यायला शिकवते. 

एकदा एका मुलाला शाळेत शिक्षकांकडून एक चिठ्ठी मिळते. शिक्षकांच्या सूचनेनुसार ती चिठ्ठी तो आपल्या आईला नेऊन देतो. चिठ्ठी वाचून आईचे डोळे पाणावतात. मुलगा आईला विचारतो, आई असे काय लिहिले आहे या चिठ्ठीत, की ते वाचून तुला रडू आले?'

आईने डोळे पुसले आणि मुलाला पोटाशी घेत म्हटले, `तुझ्या शिक्षकांनी असे म्हटले आहे, की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे, की त्याला शिकवण्यासाठी आमच्यासारख्या शिक्षकांची गरजच नाही. त्याला तुम्हीच उत्तम शिकवू शकता.' 

मुलगा आनंदाने म्हणाला, `याचा अर्थ मला आता शाळेत जायची गरज नाही?'

आईने हसून मान डोलावली आणि तीच त्याचा घरी अभ्यास घेऊ लागली. 

मुलगा हळू हळू मोठा होऊ लागला. त्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला. एवढेच नाही, तर तो मोठा वैज्ञानिक होऊन परदेशी गेला. एक दिवस त्याला आपल्या आईच्या निधनाची वार्ता समजली. तो मायदेशी परतला. आईच्या आठवणीत तिच्या वस्तूंना स्पर्श करू लागला. तेव्हा अनेक वर्षांपूर्वी त्याच्या शिक्षकांनी पाठवलेली चिठ्ठी त्याला एका डायरीत दिसली. ती चिठ्ठी वाचून मुलगा हुमसून हुमसून रडू लागला. कारण त्या चिठ्ठीत लिहिले होते, `तुमचा मुलगा अतिशय ढ आहे, त्याला शाळेत शिकवलेले काहीच कळत नाही, त्यामुळे आता तुम्हीच त्याला वाटेल ते शिकवा.'

तो मुलगा होता प्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस एडिसन! त्या मुलावर बालपणी त्याच्या आईने विश्वास दाखवला नसता, तर भविष्यात तो प्रसिद्ध वैज्ञानिक झाला नसता. आई ही आपला पहिला गुरु असते. तिच्यावर नितांत श्रद्धा ठेवा आणि तिचे उपकार कधीच विसरू नका...!