शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

'वैष्णव जन तो...' गांधीजींच्या मनात घर केलेल्या भजनाचा भावार्थ!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 2, 2020 07:00 IST

गांधी जयंती निमित्त आपणही त्यांच्या आवडीच्या भजनाची उजळणी करूया आणि महात्मा गांधींचे व पर्यायाने संत नरसी मेहतांचे उदात्त विचार अनुसरण्याचा प्रयत्न करूया. 

ठळक मुद्देवैष्णव म्हणजे अशी व्यक्ती, जी नम्र राहून, सर्वांचा आदर करते. दुसऱ्यांची संपत्ती पाहून ज्यांच्या मनात लालसा निर्माण होत नाही आणि जे सत्याची कास कधीच सोडत नाहीत, त्यांना वैष्णव जन म्हणावे. 

ज्योत्स्ना गाडगीळ. 

एकदा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्या हाती महात्मा गांधींचे एक इंग्रजी पुस्तक लागले. ते पुस्तक एका परदेशी लेखकाने लिहिले होते आणि मुखपृष्ठदेखील त्यांच्याच कल्पनेतून साकारले होते. मुखपृष्ठावर गांधीजींचा फक्त चेहरा होता, तोही पूर्ण नाही, तर कडेकडेचा हिस्सा कापला गेलेला. एवढे मोठे लेखक, भूलचुकीने असे मुखपृष्ठ नक्कीच छापणार नाहीत. यामागे नक्कीच काहितरी विचार असावा. त्या विचारावर बराच काळ विचार केल्यावर आणि पुस्तकातील संपूर्ण मजकूर वाचून झाल्यावर राज ठाकरे यांना लेखकाची संकल्पना लक्षात आली, की गांधीजींचे चरित्र 'चौकटीत' मावणारे नाही, त्याला अनुसरून लेखकाने मुखपृष्ठसजावट केली होती. 

महात्मा गांधी, हे खरोखरीच चौकटीत न मावणारे, किंबहुना वैचारिक चौकट मोडणारे व्यक्तीमत्त्व होते. 'अहिंसा परमो धर्म:' ही शिकवण देत त्यांनी समस्त भारतीयांना आपलेसे करून घेतले.  म्हणून जनतेने त्यांना आत्मियतेने 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना ते प्रेमाने वागवत असत. ही चांगल्या आचरणाची आणि शुद्ध विचारसरणीची शिकवण त्यांना  संत नरसी मेहता यांच्या `वैष्णव जन' या भजनातून मिळाली होती. ते भजन गांधीजींना एवढे आवडत असे, की त्यांनी आपल्या नित्य प्रार्थनेत या भजनाचा समावेश केला होता. गांधी जयंती निमित्त आपणही त्यांच्या आवडीच्या भजनाची उजळणी करूया आणि महात्मा गांधींचे व पर्यायाने संत नरसी मेहतांचे उदात्त विचार अनुसरण्याचा प्रयत्न करूया. 

हेही वाचा: लक्ष्मी तुमच्या हाती, म्हणा 'कराग्रे वसते लक्ष्मी:'

वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे,पर दु:खे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ।

वैष्णव कोणाला म्हणावे, जे दुसऱ्यांचे दु:ख समजून घेतात आणि दुसऱ्यांच्या दु:खाने दु:खी होतात. एवढेच नाही, तर एखाद्याच्या कठीण प्रसंगी जे मदतीचा हात पुढे करतात, परंतु केलेल्या कार्याचा अभिमान बाळगत नाहीत. 

सकल लोकमां सहुने वंदे निंदा न करे केनी रे,वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे ।

वैष्णव म्हणजे अशी व्यक्ती, जी नम्र राहून, सर्वांचा आदर करते. कोणाचीही निंदा करत नाही. ज्यांच्या वागण्या-बोलण्यात एकवाक्यता असते आणि कठीण प्रसंगातही जी निश्चल राहते. 

समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे,जिव्हा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ।।

सर्वांकडे समदृष्टीने पाहणारी व्यक्ती विरळाच. परंतु, अशी व्यक्तीच सर्वांना समान न्यायाने वागवू शकते. लिंग, जाती, वर्ण, रंग, क्षेत्र, भाषा अशा कोणत्याही बाबींमध्ये भेदभाव करत नाही. परस्त्रीला मातेसमान वागवतो. दुसऱ्यांची संपत्ती पाहून ज्यांच्या मनात लालसा निर्माण होत नाही आणि जे सत्याची कास कधीच सोडत नाहीत, त्यांना वैष्णव जन म्हणावे. 

मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे,रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे।

मोह-मायेत अडकलेली व्यक्ती दुसऱ्याच्या सुख-दु:खाचा विचार करू शकत नाही. त्यासाठी शरीराने नाही, तर मनाने वैराग्य स्वीकारले पाहिजे. तरच, मोह-मायेत अशा व्यक्तीचा पाय अडकणार नाही. रामनाम आणि रामकाम हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय असते. अशी व्यक्ती जिथे जाते, त्या ठिकाणालाच तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते. 

वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवार्या रे,भणे नरसैयो तेनु दरसन करतां, कुल एकोतेर तार्या रे।

भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे, इच्छेतून लोभ निर्माण होतो, लोभातून मत्सर, मत्सरतेतून क्रोध आणि क्रोधातून सर्वनाश. मात्र, जे वैष्णवपंथी असतात, त्यांच्या मनात कोणाबद्दलही राग, असूया, द्वेष नसतो. उलट दुसऱ्यांच्या मनातील राग, द्वेष, मत्सर अशा भावनांचा ते निचरा करतात. अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ, मात्र ती सापडली, तर तिच्यासमोर नतमस्तक व्हायला विसरू नका आणि तिच्यासारखे बनण्याचा प्रयत्न जरूर करा.

हेही वाचा : 'मेडिटेशन' सोपं नक्कीच नाही, पण एकदा जमलं की त्याला तोड नाही; सोप्या अन् उपयोगी टिप्स

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी