शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले
2
२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...
3
"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
4
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
5
अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
6
टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
7
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video
8
"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले
9
पोलीस ठाण्यातच रंगला 'प्रेमाचा' आखाडा, एका तरुणावरून दोन तरुणी भिडल्या; कहाणी वाचून चक्रावून जाल
10
कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम
11
“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!
13
टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ
14
चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण
15
Krrish 4: 'क्रिश ४'मध्ये जादूची एन्ट्री! हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, सिनेमा कधी होणार प्रदर्शित?
16
Nahik: कारमध्ये बसले अन् डोक्याला लावली बंदूक; कामगारांनीच दिली मालकाच्या अपहरणासाठी 'टीप'
17
"मी चुकीचं केलं.." जया बच्चन यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथावर' केलेल्या टीकेवर अक्षय कुमारचं उत्तर
18
"मोठं नाव, खूप फॅन्स आहेत म्हणून..."; रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान क्रिकेटरचं विधान
19
म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध
20
ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!

मना सज्जना भक्ती पंथेची जावे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:45 IST

बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो. संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरत बुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्वभावे करावे ॥

मन जर भक्तिच्या मार्गाने गेले तरच या देहाला श्रीहरिची प्राप्ती होईल. आपल्याला प्रश्न पडेल की, भक्तीचा आणि मनाचा काय संबंध..? तर योगवासिष्ठकर या प्रश्नाचे यथार्थ उत्तर देतात -

मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः ।बंधाय विषयासक्तं मुक्त्यैर्निविषयं मनः ॥

बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो.संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल. मन जर भक्तीपंथाला लागले तर संकल्परहित होऊन जाईल आणि मन एकदा संकल्प संकल्पशून्य झाले की, संसार आपोआप नाहिसा होईल आणि जिथे संसारच संपला तिथे बंधन कसले..?ज्ञानराज माऊली बहारीचं वर्णन करते -

जेथ हे संसार चित्र उमटे । तो मनोरुप पटू फाटे ।जैसे सरोवर आहे । मग प्रतिमा नाही ॥

ज्याप्रमाणे सरोवर आटले की त्यात पडलेले प्रतिबिंब आपोआप नाहिसे होते त्याप्रमाणे एकदा का मन भक्तिमार्गाला प्रवृत्त झाले की, संकल्पविकल्परहित होते आणि मन असे संकल्पविकल्परहित झाले की, संसार आपोआप नाहिसा होतो.श्रीसमर्थ रामदास स्वामी वरील श्लोकांत तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे असे म्हणतात यांत स्वभावे म्हणजे सहज, अनायासे, आपोआप असाच अर्थ आहे. याठिकाणी मनालाच उपदेश करण्याचे कारण असे की, सर्व इंद्रियांवर सत्ता गाजविणारे मनच आहे. कोणतेही सद्कर्म किंवा असद्कर्म इंद्रियांकडून घडण्याच्या आधी ते कर्म ग्राह्य किंवा अग्राह्य हे मनानेच ठरविले जाते आणि मगच ते कर्म इंद्रियांकडून घडते.तुकाराम महाराज म्हणतात -

आधी मन घेई हाती । गणराज गणपती ॥मन इंद्रियांचा राजा । त्याची सर्वभावे पूजा ॥

किंवा

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ॥

या सर्व संत प्रमाणांवरुन एकच गोष्ट निश्चित होते की, देहाकडून देवाकडे जाण्यासाठी जर मनाचे साह्य नसेल तर भक्तिमार्गाची वाटचाल अशक्य आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक