शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri 2021: ...म्हणून संसारी माणसाला देवाधिदेव महादेव जवळचे वाटतात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 11, 2021 12:39 IST

सह अंब तो सांब! असा हा सांब सदाशिव पार्वती शिवाय अपूर्ण आहे, हे तो स्वतः मान्य करतो. एकटा जीव सदाशिव! जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव!

शिवशंकर हे खरे कुटुंबवत्सल! योगी, बैरागी, समाधिस्थ असे त्यांचे रूप आपण पाहतो. पण त्यांच्या कथा ऐकताना गोष्टीची सुरुवात नेहमी, 'एकदा कैलासावर शंकर पार्वती बसले होते' या वाक्याने होते. याचा अर्थ विश्वाचा व्याप सांभाळूनही ते आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतात हे सिद्ध होतं. ते गणोबाचं कौतुक करतात, कार्तिकेयाला मोठा मुलगा म्हणून घडवतात. दोन मुलांमध्ये स्पर्धा लावून जबाबदार पित्याप्रमाणे त्यांची भांडणं सोडवतात. शिवाय उमेवर जीवापाड प्रेम करतात. देव दानव यांच्यात भेद न करता जो मनोभावे साद घालेल त्याच्यावर प्रसन्न होतात.

असा हा संसारी असूनही योगी पुरुषांप्रमाणे विरक्त राहणारा देव उमेला कसा काय आवडला? हा तिच्या पित्याला पडलेला प्रश्न! विष्णूंकडचं स्थळ सांगून आलेलं असताना, वैभव लक्ष्मीचं सुख पायाशी लोळण घेत असताना पार्वतीला हा स्मशानपती का आवडावा, हे न उलगडलेलं कोडं! त्यावर उमाही निरुत्तर! प्रेम शब्दात सांगता आलं असतं तर काय हवं होतं? वैकुंठाचं वैभव सोडून तिने लंकेची पार्वती होणं पसंत केलं. शंकरांनी तिला पायाशी नाही तर हृदयाजवळ स्थान दिलं, अर्धनारीनटेश्वर स्वरूपात आणि ती सुद्धा त्यांची सावली बनून वावरू लागली.

सह अंब तो सांब! असा हा सांब सदाशिव पार्वती शिवाय अपूर्ण आहे, हे तो स्वतः मान्य करतो. एकटा जीव सदाशिव! जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव! दोघांपैकी एकानेही दुसऱ्याची साथ सोडली, तर उरेल फक्त शव...!

शिवशंकराने कुटुंबाबरोबर विश्वाची जबाबदारी सार्थपणे पेलून धरली आहे. समुद्र मंथनातून आलेली रत्न देव दानवांनी बळकावली, पण हलाहल घ्यायला कोणी पुढाकार घेईना! बरोबर आहे, वाईटपणा कोण घेणार हा प्रश्न नेहमीचाच! शिवशंकराने जगाच्या कल्याणासाठी विषाचा प्याला ओठी लावला आणि राम नामाने तो दाह शांत केला. तेव्हापासून ते आजही समाधिस्थ अवस्थेत असतात, तेव्हा अखंड राम नाम घेत असतात.

शिवशंकराच्या ठायी असलेली शांतता अनुभवायची असेल, तर शिवालयाला पर्याय नाही. तिथल्या वातावरणातील शांतता क्षणार्धात मनात उतरते. मनातले सगळे प्रश्न संपून 'ऑल इज वेल' ही ग्वाही मिळते आणि आशा भोसले यांचे शब्द कानी घुमतात... माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश!  आहे की नाही हे कुटुंब आपल्यापैकीच एक...!