शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

या अशांत जगात मन शांत कसे ठेवायचे हे सांगताहेत भगवान बुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 07:00 IST

भगवान बुद्धांची देहबोली आणि त्यांचे विचार शांत, समाधानी आयुष्याचा आदर्श घालून देतात. वाचा ही प्रेरक कथा...

भगवान बुद्धांचे असंख्य शिष्य होते. त्यापैकी एक होता, 'पूर्णा.' त्याची साधना पूर्ण झाली होती. म्हणून तो बुद्धांना म्हणाला, 'भगवान, आता आपण मला अनुज्ञा द्या. मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे.'

भगवान म्हणाले, 'ठीक आहे. माझी अनुज्ञा आहे. परंतु मला अगोदर सांग, तू कुठे जाणार आहेस?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे. जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्खू गेलला नाही आणि तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही. म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली.'

भगवान म्हणाले, 'अरे, तिकडे कोणीही भिक्खू गेला नाही, याला कारण आहे. तिथले लोक फार वाईट आहेत म्हणे! तू तिथे गेलास, तर कदाचित ते तुझा अपमान करतील, मग तू काय करणार?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी नुसता अपमानच केला. शिव्या वगैरे दिल्या, पण मारले तर नाही ना.'

भगवान म्हणाले, 'समजा, एखाद्याने तुला खरोखरच मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, तरीही मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी मला नुसते मारले, जीव तर नाही घेतला.'

भगवान म्हणाले, 'तुला आता आणखी एक, शेवटचा प्रश्न विचारतो. समजा, त्यांपैकी एकाने तुला जिवे मारले, तर तू काय करशील?'

पूर्णा म्हणाला, 'भगवान, याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन. कारण, त्यांनी मला जीवनमुक्ती दिली. नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहकून गेलो असतो.'

यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले, 'पूर्णा, तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास. आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करू शकतोस. कारण, तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील. ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही.'

भगवान महावीरांच्या बाबतीत असे सांगतात, की ते काट्यावरूनही अनवाणी चालू शकत असत. कारण, ते चालताना काटे आपली वर असलेली टोके खाली करत असत. महंमद पैगंबरांच्या बाबतीतही म्हटले जाते, वाळवंटातून प्रखर उन्हात चालत असताना त्यांच्या डोक्यावर नेहमी एक ढग सावली धरत असे. उलटे होणारे काटे व सावली धरणारा ढग यांच्यावर विश्वास ठेवणे कदाचित अवघड वाटेल. परंतु, एक मात्र नक्की, ज्याच्या मनात काटे नाहीत, त्याच्या पायांना काटे टोचणार नाहीत आणि ज्याच्या हृदयात जळणारी वासना नसेल, त्याला उन्हाच्या कडाक्यातही सर्वत्र सावली असल्याचा भास होईल. 

एकूणच काय, तर सर्व काही चित्तवृत्तीवर अवलंबून असते. ती जोपर्यंत शांत असते, तोपर्यंत बाहेरील विषम स्थितीचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही.