शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचा ‘आस’ स्थिर हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 04:16 IST

काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही.

- बा. भो. शास्त्रीप्रत्येक युगाचा एक धर्म व अधर्मही असतो. धर्म सिद्धांत अढळ असतात. आचारसंहितेत विचाराला अनुसरून कालपरत्वे परिवर्तन होत असतं. ऋतुपरत्वे, वयपरत्वे आहार-विहार बदलतात. तसं आचाराचं मूळ स्वरूप तसेच ठेवून कालानुरूप थोडा बदल होत असतो. काळासोबत न चालणारे धर्म लुप्त झालेत. म्हणून काळासोबत चालायला शिकलं पाहिजे असे म्हणतात आणि ते खरंही आहे. काही ज्ञानशाखा कालौघात लुप्त झाल्या. पुढच्या पिढीला ते ज्ञान आज ठाऊक नाही. आचार हा जात्याच्या वरच्या पाळूसारखा फिरणारा असावा; पण खालची पाळू अधिष्ठान असते ती स्थिर असावी लागते. कारण ती विचाराची असते. विचाराचं फिरणं हा अधर्म आहे. बैलगाडीचं चाक फिरतं, ‘आस’ फिरत नाही. न फिरणारा आस जगभर फिरणाऱ्या चाकाचा आधार असतो. असाच जीवनमूल्यांचा सिद्धांत स्थिर असावा. पाण्यातली शीतलता, अग्नीतली दाहकता, भूमीचं जडत्व, हवेतली चंचलता व आकाशाची अलिप्तता हे धर्म जडभूतांनी सांभाळले आहेत. गाय मांस खात नाही अन् सिंह गवत खात नाही. हे पशूपण धर्मासी प्रामाणिक आहेत. माणूसच धरसोड करतो. त्याचं स्वभावावर नियंत्रण नाही. निसर्गाने वटवाघूळ, साप, झुरळ, किडे हा आहार सांगितला नाही. त्याचे अतिवाईट परिणाम आपण भोगत आहोत. भोगात भोग असतात तसे रोगही असतात. हेच आरोग्यशास्त्र जगाला सांगत आलं आहे. सृष्टीत विषय खूप आहेत; पण भोगण्याचे ज्ञान हजारात एखाद्याला आहे, म्हणून सदोष भोगापासून सावधान. आजच्या सूत्रात श्रीचक्रधर हेच सांगतात. ‘कलियुगी विखो आति परि विखया नाही’ आपल्याला वाटेल, राजे महाराजे यांच्याजवळ विषय असून वैद्यही असतात. ते पदार्थांचं योग्य सेवन करत असतील? यावर स्वामी म्हणतात, ते भुकेची पिडा दूर करतात. त्यात पोषणाचा विचार नसतो. ते केवळ संकोच फेडतात. त्यांना विषयाचा आनंद संपूर्ण घेता येत नाही. याचा अर्थ कलियुगात सर्वच इंद्रियाचे विषय भरपूर आहेत, पण भोक्ता नाही.