शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Sugad Puja On Makar Sankranti मकरसंक्रांतीला 'असे' करा सुगड पूजन; पाहा, योग्य विधी, महत्त्व आणि मान्यता

By देवेश फडके | Updated: January 12, 2021 19:44 IST

आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकरसंक्रांतीचा सण आपणास देतो. सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता? जाणून घेऊया...

ठळक मुद्देसंक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव; येथून पुढे उत्तरायण सुरू होतेमकरसंक्रांतीचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व; महिला करतात सुगड पूजन सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता? जाणून घ्या

भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की, पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकरसंक्रांती. संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकरसंक्राती असे म्हटले जाते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकरसंक्रांतीचा सण आपणास देतो.

मकरसंक्रांती म्हटले की, प्रथम आठवतात ते तीळगुळ आणि पतंग उडवणे. आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना धार्मिक, सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व असते. तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते. मकरसंक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते. सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता? जाणून घेऊया...

महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुघड पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढावी. पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे. काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे. सुगडावर अक्षता, फुले, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर धूप, दीप अर्पण करावे. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा. 

काही ठिकाणी विशेषत: कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी सुगड दान करण्याची प्रथा आहे. एकमेकांकडे जाऊन याकाळात सवाष्ण महिला वाण लूटतात. कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते. त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले. 

सुगड म्हणजे काय? 

मकरसंक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते, हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. 'सुघट' या शब्दाचा तो अपभ्रंश होय. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घड. या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते.

 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती