शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

महाभारताच्या युद्धांनंतर शांतीयज्ञ होणे गरजेचेच होते, अन्यथा...!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 18, 2021 12:12 IST

नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर नेते.

संसाराकडे, जीवनाकडे कर्मभोग म्हणून पाहणारी अर्थातच स्वहिताकडे लहानपणापासून लक्ष ठेवून असणारी महामाता कुंती, भगवान श्रीकृष्णांना एकदा म्हणाली, 'भगवान कृष्ण, हा अहंकार आत्मोन्नतीसाठी घातक ठरतो. याला बाजूला सारण्याचा हुकुमी उपाय म्हणजे तुझे सतत नामस्मरण माझ्या मनाला हे वारंवार बजावीत असतानाही हे नाठाळ मन या अहंकाराच्या आहारी जाऊन कधीकधी मला तुझे विस्मरण होण्यास भाग पाडते. म्हणून भगवंता, तुझ्याजवळ एकच मागणे आहे, ते म्हणजे जगातील दु:खे आशीर्वाद म्हणून माझ्या पदरी टाक, जेणे करून 'भगवंता सोडव' त्यापलीकडे माझ्या मुखातून काहीही येणार नाही.'

महाभारत युद्धानंतर झालेली जीवितहानी पाहून पांडवांचे मन विषण्ण झाले. दोन कुटुंबांच्या वादात, अहंकारात अकारण निष्पाप जीवांचा बळी गेला. विजय मिळूनही त्याचा आनंद उपभोगावा अशी परिस्थिती नव्हती. आपल्या हातून घडलेल्या पातकाची टोचणी त्यांना अस्वस्थ करत होती. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना एक यज्ञ करावयास सांगितला व त्याच्या मुख्य अधिकारपदासाठी जगातील घडामोडींचा संपर्कही नसलेल्या आणि निर्जन ठिकाणी आश्रम स्थापून राहिलेल्या वकदालभ्य मुनींना बोलवा, अशी आज्ञा केली. 

अनुक्रमे पाच पांडव त्यांना बोलवण्यास गेले. परंतु त्यांनी येण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे एकच! शंभर यज्ञ झाले असतील तरच त्या ठिकाणी मी जातो. अर्जुनाने तर महाभारत युद्धाचा विषय काढताच वीज कडाडावी तसे ते ओरडले, 'कसले युद्ध? आम्हाला असली भाषाच माहीत नाही. हा शांतिआश्रम आहे, चल नीघ इथून!' शेवटी कुंतिमातेने द्रौपदीच्या कानामध्ये काही सांगितले. शेवटचा उपाय म्हणून द्रौपदी त्यांना बोलवण्यास गेली. 

अहंकाररहित नम्र अशी ती पांचाली आश्रमात पोहोचताच त्यांना म्हणाली, 'मुनिवर्य, आपली शिष्या पांचाली आपणास अभिवादन करीत आहे. पांडवपत्नी द्रौपदी, आपण शांतियज्ञाला यावे अशी विनंती करत आहे. प्रत्येक जीवात्म्याला शांतता मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून शांतीयज्ञाचे आयोजन करत आहोत. अन्यथा गत जीवात्म्यांना मुक्ती मिळणार नाही. आजवर पांडवांनी धर्माला अनुसरूनच प्रत्येक कार्य केले आणि ते कार्य श्रीकृष्णाला समर्पित केले.  मुनिराज, लहानपणापासून महामाता कुंतीदेवींनी स्वत:ला व पांडवांना प्रत्येक कर्म भगवान स्मरणात करण्याची सवय लावून घेतली आहे. इतकेच नव्हे, तर आपणापुढे उभा असलेला हा नश्वर देहसुद्धा सतत नामचिंतन करीत असतो आणि मुनिवर्य, 'नाम घेता वाट चाली, यज्ञ पावलो पावली' हे तर आपलेच वचन. यामुळे महामाता कुंतीच्या व त्यांच्या पुत्रसुनेच्या यज्ञांची संख्या कशी मोजणार?' एवढ्या संभाषणात 'मी' चा चुकूनसुद्धा उच्चार न झालेल्या व असंख्यात यज्ञ झाल्याची खात्री देणाऱ्या द्रौपदीला हसून मुनींनी होकार दिला.

पांचालीच्या नम्र आचरणाने आणि मधुर संभाषणाने शांतियज्ञ व्यवस्थितरित्या पार पडला. सर्व जीवात्म्यांना सदगती मिळाली. पांचालीच्या पुढाकाराने हे साध्य झाले. तिच्या ठायी एवढी विनम्रता आली, ती नामस्मरणामुळे आणि भगवंत भक्तीमुळे!  नामस्मरणाने अहंकार जातो व अहंकाररहित नामस्मरण जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पातळीवर नेते. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये लिहितात, 

रघुनायकावीण वाया शिणावे,जनासारिखे व्यर्थ का वोसणावे,सदा सर्वदा नाम वाचे वसो दे,अहंता मनी पापिणी ते नसो दे ।।श्रीराम।।