शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गर्भामध्ये असतानाही संस्कार घडवावे, ही खूप चांगली समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 06:05 IST

लहानपणापासून आई-वडील आपल्या मुलांवर एकसारखे संस्कार करतात. तरीसुद्धा प्रत्येकाचा व्यवहार, विचार करण्याची पद्धती, आवड-निवड निराळी असते. आज समाजात गर्भसंस्काराचे खूप महत्त्व आहे.

- नीता ब्रह्मकुमारीमहाभारतातील अभिमन्यूची भूमिका सर्वांना माहीतच असेल. गर्भामध्ये राहून चक्र व्यूहाचे ज्ञान घेणारा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो? जन्माला येण्यापूर्वीच कुणी इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो, याचे कधी-कधी नवलच वाटायचे; पण आज हे सत्य आपणा सर्वांनाच समजले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही, तर जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्त्व आपण जाणून घ्यावे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संस्कारांचे महत्त्व आहे. जसे संस्कार तसा स्वभाव, व्यवहार आणि त्यानुसार जीवन दिसून येते. आपण पाहिले असेलच की, घरामध्ये जितके सदस्य आहेत त्या प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत.

लहानपणापासून आई-वडील आपल्या मुलांवर एकसारखे संस्कार करतात. तरीसुद्धा प्रत्येकाचा व्यवहार, विचार करण्याची पद्धती, आवड-निवड निराळी असते. आज समाजात गर्भसंस्काराचे खूप महत्त्व आहे. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की, हे संस्कार नक्की कोणावर घडविले जातात? शरीरावर की शरीरामध्ये असलेल्या आत्म्यावर? शरीर हे एक साधन आहे, ज्याला ‘आत्मा’ ही शक्ती चालविते. प्रत्येक जन्मामध्ये जे आपण अनुभविले, त्या जन्मी मिळालेल्या जन्मदात्यांनी दिलेले संस्कार, परिस्थितीनुसार जो स्वभाव बनला, ज्या प्रकारच्या सवयी स्वत:ला लावल्या, असे खूप काही आत्मा मरणोत्तर स्वत:बरोबर घेऊन जातो.

फक्त एका जन्माचे नाही; पण कितीतरी जन्मांचे संमिश्रण प्रत्येकामध्ये आहे. जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म, अशा चक्रामध्ये सर्वच बांधले गेले आहेत; पण एखादी गर्भवती महिला जेव्हा नव्याने त्या आत्म्याचे स्वागत करते, तेव्हा अनेक प्रकारची काळजी त्या जन्मप्रसंगासाठी घ्यावी लागते. शरीराचे अवयव छोटे असले, तरी त्या आत्म्यामध्ये पूर्वजन्माचे खूप काही भरलेले असते. जन्माला आल्यानंतर खूप काही शिकविण्यापेक्षा गर्भामध्ये असतानाही संस्कार घडवावे, ही खूप चांगली समज आज पालकांमध्ये जागृत होत आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक