शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा आनंद उपभोगायचा असेल, तर विनाआट प्रेम करायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 10:05 IST

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते.

भय नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे लोकांवर विनाअट प्रेम करा. तुमच्या मनात जर काही अटी असतील, तर तुम्ही कधीच प्रेम करू शकणार नाही. त्या अटीच तुमच्या मार्गातील अडथळे बनतील. प्रेम करण्याचा लाभ तुम्हाला स्वत:ला होत असतो. मग अटी कशासाठी हव्यात? प्रेम तुम्हाला इतका लाभ करून देते, इतक्या आशीर्वादाचा वर्षाव करते की त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला काहीच मागण्याची गरज उरत नाही. म्हणून विनाअट प्रेम करा. तुम्हाला लक्षात आले, की प्रेम करण्यानेच निर्भयता विकसित होऊ शकते, म्हणजे तुम्ही स्वाभाविकपणे प्रेम कराल. मग तुम्ही प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम कराल.

सर्वसामान्यपणे आपल्या अटी पुऱ्या झाल्या की लोक प्रेम करतात. लोक म्हणतात, तू असा वागलास तर मी तुझ्यावर प्रेम करेन. या अटींमध्ये प्रेम गुदमरून जाते. प्रेम म्हणजे अनंत आकाश आहे. त्याला तुम्ही अटींच्या सीमित, संकुचित अंगणात कसे उतरवू शकाल? तुम्ही घरात तजी हवा घेऊन या. मग घर कडेकोट बंद करून टाका. लवकरच ती हवा नासायला लागेल. प्रेम स्वतंत्र आहे, त्याला घराच्या भिंतीत कोंडून ठेवू नका.

तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा सारे काही सुंदर वाटते. कारण त्या घडीला तुमच्या मनात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. कोणत्याही अटी नसतात. दोन माणसं काहीही अपेक्षेविना एकमेकांच्या जवळ आलेली असतात. पण एकदा ते एकत्र राहायला लागले, अनोळखीपण संपले की अटी थोपवायला सुरुवात होते. अशा वेळी तुम्ही प्रेमाचा सौदा करता. 

प्रेम करणे हेच प्रेमाचे साध्य असले पाहिजे. तिथे कसलीही अपेक्षा नसेल, तरच प्रेमाचा निर्भेळ आनंद घेताही येईल आणि देताही येईल.