शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

खरा यज्ञ कोणता विचाराल, तर तो आहे निष्काम कर्माचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 21, 2020 21:34 IST

मनात स्वार्थ ठेवून केलेल्या कामापेक्षा निष्काम मनाने केलेली सेवा, कर्मयज्ञाचे पुण्य मिळवून देते.

ज्योत्स्ना गाडगीळ 

कुरुक्षेत्रावरील घनघोर युद्धाचा वणवा शांत झाल्यानंतर पाचही  पांडवांनी मिळून एक महायज्ञ केला. यज्ञाचा थाटमाट पाहून सगळे लोक दिपून जाऊन एकमुखाने यज्ञाची प्रशंसा करीत म्हणू लागले, की असा यज्ञ यापूर्वी साऱ्या दुनियेत कधी झाला नसेल. यज्ञाची सांगता होत होती आणि अशा समयी एक लहानसे मुंगूस तिथे येऊन उपस्थित झाले.  त्या अद्भुत मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी आणि अर्धे काळे होते. यज्ञमंडपात शिरताच ते मुंगूस तेथील यज्ञभूमीच्या मृत्तिकेवर इतस्तत: लोळू लागले. शेवटी ते तेथे जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणू लागले, 'तुम्ही सारे लबाड, खोटारडे आहात. असा यज्ञ पूर्वी कधी झाला नव्हता म्हणे! हूह...! अहो, हा तर मुळी यज्ञच नाही.'

लोक म्हणाले, 'काय, म्हणतोस तरी काय तू? त्यावर ते मुंगूस महणाले, `असं होय, ऐका तर मग. एक लहानसे खेडेगाव होते, तिथे एक लहानसे खेडेगाव होते, तिते एक गरीब माणूस आपल्या स्त्री, पुत्र नि सुनेसह राहत होता. तो अतिशय ज्ञानी होता. पोथ्यापुराणे व धर्मोपदेश यांच्याद्वारा मिळणाऱ्या दक्षिणेवरच त्याची गुजराण होत असे.

हेही वाचा : प्रत्येक काम भगवंताचे समजून करा; पांडुरंगशास्त्री आठवलेंचा 'स्वाध्याय'

एकदा त्या देशात एकामागून एक सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. बिचाऱ्या  त्या माणसाच्या कुटुंबाला पराकाष्ठेचे दु:ख सहन करावे लागले. एक वेळ तर त्या कुटुंबाला पाच दिवस फाके पडले. सहाव्या दिवशी सकाळी पित्याला मोठ्या सुदैवाने थोडेसे जवाचे पीठ मिळाले. त्याने ते घरी आणून त्याचे चार भाग केले आणि ते चौघात वाटून घेतले. स्वयंपाक आटपून त्यांनी जेवणाची तयारी केली आणि आता तोंडात घास घालणार इतक्यात दारावर थाप वाजली. दार उघडून बघतो तो एक अतिथी समोर उभा. तो माणूस अतिथीला म्हणाला, `यावे महाराज, आपले स्वागत आहे.'

त्या उदार माणसाने अतिथीसमोर स्वत:चा भाग ठेवला. क्षणार्धात सारे मटकावून अतिथी म्हणाला, `महाराज, मी दहा दिवसांचा उपाशी मी ह्या अपुऱ्या अन्नाने दोन घासांनी तर माझ्या पोटातील आगीचा डोंब आणखीनच भडकवला आहे.'

हे ऐकून त्याची पत्नी आपल्या पतीस म्हणाली, `हे अतिथी आपल्या घरी आले आहेत. त्यांना पोटभर जेवू घालणे, आपले कर्तव्य आहे. त्याअर्थी माझाही वाटा मी यांना देणे उचित..' असे म्हणून त्या पतिव्रतेने आपला भाग त्या अतिथीपुढे ठेवला. क्षणर्धात त्याचाही चट्टामट्टा करून अतिथी म्हणाला, `बापरे, ही राक्षसी भूक मला अजूनही नुसती जाळत आहे. प्राण चाललेत माझे.' त्यावर उदार माणसाचा मुलगा लगबगीने उद्गारला, `आपण माझ्याही वाटचे अन्न ग्रहण करावे. पित्याला आपल्या कर्तव्यपालनात हातभार लावणे हा पुत्र या नात्याने माझा धर्मच होय.' अतिथीने तेही संपवले. परंतु त्याची भूक मात्र मुळीच शमली नाही. आता पूत्रवधूची पाळी आली. त्या साध्वीनेही आपला वाटा अतिथीला अर्पण केला आणि तेव्हा कुठे भूक शांत होऊन अतिथी तृप्त झाला. अखेरीस सर्वांना मनापासून आशीर्वाद देत तो मार्गस्थ झाला.

भुकेने व्याकुळ होऊन चौघेही इहलोकीची यात्रा संपवून गेले. मात्र जाता जाता त्यांच्याकडून निरपेक्षपणे हा महान यज्ञ झाला होता. त्या पिठातील काही थोडेसे तेथील जमिनीवर पडले होते. त्यावर मी लोळलो आणि चमत्कार असा की माझे अर्धे शरीर सोनेरी बनून गेले. तेव्हापासून, आणखी एखादातरी तसा यज्ञ पाहावयासा मिळावा या इच्छेने मी सारे जग पालथे घालत भटकत फिरतो आहे. परंतु, परत तसा यज्ञ कुठे दिसला नाही आणि माझे उरलेले अर्धे शरीर सोन्याचे झाले नाही. समजले, एवढ्यासाठी मी म्हणालो होतो, की तुम्ही ज्याचा एवढा उदो उदो करत आहात तो मुळात यज्ञ नाहीच!' कर्तव्यासाठी संपूर्ण स्वार्थ-त्यागाचे, निष्काम कर्मरूपी यज्ञचे हे परमोज्ज्वल उदाहरण! आता तुम्हीच सांगा, या सकाम यज्ञाची तुलना त्या निष्काम यज्ञाशी होऊ शकेल का?

मुंगसाचे बोलणे ऐकून पांडवांसह नगरजनही वरमले. 

हेही वाचा : हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी!- आशोंची बोधकथा!