शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: सुख उत्पादन योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:05 IST

जेव्हा एखादा माणूस आतून चैतन्यमय बदलाचा अनुभव घेतो तेव्हा आनंदनिर्मितीच्या त्या तत्त्वांना यशस्वी व्हायला वेळ लागत नाही.

नीता ब्रह्मकुमारीदु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढवायचे असेल तर सकाळी अंथरुणातून उठण्याआधी शरीराला सैल सोडून आज दिवसभरात काय करायचे आहे, याची कामावली नजरेसमोर आणावी. प्रत्येक लहान कार्यात मला यश मिळतेय आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे, अशी कल्पनाही आनंद देईल. प्रत्येक कार्याचे सुंदर चित्र डोळ्यासमोर आणून त्यातील आनंद अनुभवायचा ध्यास घ्यावा. कारण ज्याचे चित्र मानसपटलावर रंगवले जाते ते वास्तवात उतरते. मग ते सुखाचे असो वा दु:खाचे. जर कोणी सकाळी उठल्यावर म्हणत असेल की ‘उगवला आणखी एक कठीण दिवस’ तर त्याचा दिवस कसा जाईल? म्हणून सकाळी उठल्यापासून अनेकदा स्वत:ला काही सकारात्मक विचार द्यावे... माझी खात्री आहे की आजचा दिवस अद्भुत असेल. मी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या उत्तम आहे. मला जे जे मिळाले आहे त्याबद्दल मी ऋ णी आहे. जे माझ्याजवळ आहे आणि जे मला मिळणार आहे त्याबद्दल मी आभारी आहे. आज उद्भवणाऱ्या समस्यांना मी यशस्वीपणे हाताळू शकतो असा माझा विश्वास आहे. ईश्वर माझ्यासोबत आहे आणि तोच मला सगळ्यातून पार पाडत आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे.’

जेव्हा एखादा माणूस आतून चैतन्यमय बदलाचा अनुभव घेतो तेव्हा आनंदनिर्मितीच्या त्या तत्त्वांना यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. एका कार्डवर लिहिले होते ‘सुखाचा, आनंदाचा मार्ग : - तुमचे हृदय तिरस्कारापासून आणि मन चिंतेपासून मुक्त ठेवा. साधेपणाने जगा, अपेक्षा कमी करा, इतरांचा विचार करा, तुमचे आयुष्य प्रेमाने भरून टाका, सूर्यप्रकाशाचा सडा टाका, स्वत:ला विसरा, इतरांचा विचार करा, तेच करा जे तुमच्यासाठी केले जावे असे तुम्हाला वाटते. एक आठवडाभर असे वागून पहा आणि तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल.’सुखाचे उत्पादन करायचे असेल तर अशा सकारात्मक विचारांचे साहित्य आपल्याजवळ जमा करा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक