शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

देव सर्व ठायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:56 IST

सबंध चैतन्यमय सृष्टी देवाच्या व्यापकत्वाने भरुन आहे, अशी दृष्टी जेव्हा भक्तात विकसीत होणे सुरु होते.

ब्रह्माउन्मादपरमानंदे । जंव जंव पाहे स्वानंदबोधे । तंव तंव चराचर पूर्णानंदे । देखे स्वानंदकंदे दुमदुमित॥ पृथ्वी आप तेज वायु नभ ।देखे हरिरुप स्वयंभ। भूतां महाभूतांचे डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे ॥

          तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है ।        जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है ॥                  एक ती दृष्टी आहे जी देवाला फक्त मूर्तीत पाहते. केवळ मूर्तीत भक्ती आहे. एक ती दृष्टी आहे ज्याला कुठेच देव दिसत नाही. मूर्तीतही नाही. भक्ती या विचारापासूनच तो विभक्त असतो. ज्याला मूर्तीत देव दिसतो त्याने  मानले आहे की, मूर्तीत देव आहे व ज्याला मूर्तीत देव दिसत नाही त्याने मानले आहे की देव मूर्तीत नाही. अशी भक्त अभक्ताची दृष्टी असते.              परंतु तिसरी एक दृष्टी आहे जिला भारतात ज्ञानदृष्टी म्हटले गेले आहे. ज्यांना देव मूर्तीत दिसतो व ज्यांना देव नाही दिसत त्या दोघांनी आपल्या सामान्य दोन डोळ्यांचे दृष्टीने, चर्मचक्षुने पाहून, स्थुल दृष्टीने पाहून ठरविले आहे की देव आहे की नाही.  परंतु तिसरी जी एक दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी. जिला आम्ही दिव्यदृष्टीही म्हटले आहे, ती तिसर्‍या नेत्राची दृष्टी मानली आहे. ती भगवान शिवाचे, महादेवाचे कपाळाचे ठिकाणी तिसर्‍या डोळ्याचे रुपाने दाखविली जाते. म्हणून तर महादेवाला आम्ही त्र्यंबकेश्वर म्हणतो. तिसरा नेत्र असलेला ईश्वर. आम्ही तिसरा नेत्र चित्रात दाखवितो. पण ती नेत्र दाखविण्यासाठीची चित्र कल्पना आहे. पण वास्तवात दोन डोळ्याचे मध्यभागी असलेली ती सुक्ष्म अनुभूति आहे. जो ज्ञानी भक्त शिवत्वाच्या स्वरुपाला, सुक्ष्म स्वरुपाला जाणतो त्याचे ठायी सुध्दा हा तिसरा नेत्र खुलतो. तिसर्‍या नेत्राची दिव्य दृष्टी खुलते. त्याचेकरिता मग देव नाही अशी जागा नाही. एकनाथ महाराज म्हणतात, त्याला सर्व ठायी, वनी जनी जनार्दन दिसू लागतो. ठायी ठायी त्याला आत्मतत्वरुपाने  देवाचे अस्तित्व दिसू लागते आणि हे अस्तित्व व्यक्तिरुप नाही तर आनंदरुप, चैतन्यरुप जाणवते. म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात                      ब्रह्माउन्मादपरमानंदे ।                    जंव जंव पाहे स्वानंदबोधे ।      तंव तंव चराचर पूर्णानंदे । देखे  स्वानंदकंदे दुमदुमित॥

ब्रह्मा उन्माद परमानंदे. ब्रह्म म्हणजे आमचा निर्माता देव. त्या देवाच्या, ब्रह्माचे आनंदाच्या उन्मादाने, त्या देवाचा आनंद एवढा प्रचंड आहे, एवढा उन्मादरुप आहे की, दिव्यदृष्टी लाभलेल्या त्या भक्ताला, आपल्याच ठायी असलेल्या आनंदाचा बोध होतो, स्वानंदाचा बोध होतो. आपणही आनंद स्वरुप असल्याचे बोधाने तो जेव्हा जेव्हा जेथे जेथे पाहतो, अनुभवतो, तेव्हा तेव्हा अवघे चर अचर, स्थीर अस्थिर जे काही आहे सृष्टीत तेथे तेथे देव आहे हे तो जाणतो.                   पृथ्वी आप तेज वायु नभ ।         देखे हरिरुप स्वयंभ। भूतां महाभूतांचे डिंभ ।               न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे ॥पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश ही सर्व पंचमहाभूते,त्याला हरिरुप, देवरुप दिसू लागतात. मनुष्य, पशु,पक्षी, वृक्ष आदि भूत असो की पंचमहाभूत असो  सर्वा ठायी अभिन्न असे ब्रह्मरुप, देवाचे रुप तो भक्त पाहतो. हे अभिन्नत्व एवढे एकरुप आहे या अभिन्न देवत्वाला सोडून भिन्न असा अंकुर त्याला कुठेही दिसतच नाही.चंद्र, सूर्य,  अग्नीरुप तेजस्वी तारे  लखलखीतपणा,  प्राण्यांच्या नयनातील तेज, हे सर्व त्या दिव्य सतेज आत्मज्योतीरुपाने भक्त पाहतो. वाघाचे डोळ्यातील तेजस्वीता वा गाईचे, हरिणाचे पाडसाचे डोळ्यातील निर्मळ तेज ही त्या पशुची आपली निर्मिती नाही. ती तेजस्वीता देवाची आहे, हे तो भक्त पाहतो.           सबंध पृथ्वी गंध रुप आहे. परंतु तिचा तो गंध गुलाबांसारख्या विविध फुलांतून, कस्तुरीतून, चंदनातून, कापूरातून जसा स्पष्ट जाणवतो, तशी देवाची सत्ता सर्वत्र त्या भक्ताला जाणवते.           यालागी सात्विका ठायी सत्व ।                तेथ देखे भगवत्तत्त्व ।   सत्त्वे सत्त्ववंता महत्त्व । अति मान्यत्व हरिरुपे ॥

सात्विक गुणाच्या ठिकाणीच जे सत्त्व असते, ते भगवत सत्त्व आहे.  जे खरे सात्त्विक आहेत, सत्त्ववंत आहेत, त्यांना या शुध्द सत्त्वामुळेच, महत्त्व  व देवरुपाने मान्यता मिळते.        पृथ्वी भोवती जे जळाचे आवरण आहे, त्याला चतुःसमुद्र म्हणतात. ते समुद्र, तसेच पूर्व पश्चिम इत्यादि जे दशदिशांचे भाग आहेत ती सर्व देवाचीच अंगे आहेत. त्या अंगाने तो श्रीरंग भक्ताला अंगरुप, मूर्तीरुप भासतो. ह्या विशाल मूर्तीच्या रुपाने तोच देव उभा आहे असे तो पाहतो. जर छोटी पाषाण मूर्ती तो आहे तर विश्वव्यापक अस्तित्वरुप मूर्तीही त्याचीच आहे हे तो भक्त जाणतो. गवत, दुर्वा, हराळ, वृक्ष, वेली हे जणु त्याच्या शरीराचे रोम आहेत असे तो भक्त हरिरुप दृष्टीने पाहतो. मोठ्या वटवृक्षाच्या पारंब्या वेगवेगळ्या जरी दिसत असल्या तरी त्यांचे अस्तित्व हे वटरुपानेच असते. त्याचप्रमाणे देवाचे चैतन्यापासूनच अनेक नद्यांचे ओघ चैतन्यमयरुपाने वाहत असल्याचे तो भक्त पाहतो.                अशा प्रकारे सृष्टीतील वेगवेगळी रुपे पाहतांना, जसजसा त्याचा उल्हास, आनंद वाढत जातो, तसतसे सर्व जग हे देव रुपाने नटलेले आहे असे तो भक्त अनुभवतो. मग त्या अनुभव स्थितीत गवत असो की पाषाण, मुंगी असो की माशी, मच्छर असो की गरुड, गाय असो की गाढव, कुणी निंद्य असो की वंद्य तो त्या सर्वांना एक देवाचे तत्वरुपानेच पाहतो.                एकनाथ महाराज म्हणतात की, असा अनुभव कशाने येतो ?               करिता पूजाविधीविधान।                 का श्रवण मनन चिंतन ।                      सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण ।             "पूर्ण प्राप्ती" जाण त्यातेचि वरी ॥

            या असीम सृष्टीत मी च एक नाही तर सबंध चैतन्यमय सृष्टी देवाच्या व्यापकत्वाने भरुन आहे, अशी दृष्टी जेव्हा भक्तात विकसीत होणे सुरु होते व ह्या दृष्टीतून तो पूजाविधी, श्रवण, मनन, चिंतन  करु लागतो आणि त्यातून सर्व अस्तित्व एकाच चैतन्याने भरलेले आहे अशी एकतत्वरुपी भावना त्याचे ठिकाणी निर्माण होते तेव्हा त्याचे ठायी, "मी" पणाचे लघुत्व, सिमित्व न राहता व्यापकत्वाने पूर्णत्वाची प्राप्तीच अशा भक्ताला होते. तेव्हा तो जेथेही जातो तेथे त्याला देवाचे अस्तित्व दिसते. सर्व ठायी देव दिसतो.

                                       

- शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिक