शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धर्मगुरु गुरु गोविंद सिंह यांनी शीख बांधवांना सांगितलेले मौलिक विचार!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 19, 2021 16:15 IST

गुरु गोविंद यांनी सांगितलेले काही उपदेश आपणही विचारात घेण्यासारखे आहेत. 

शिखांचे दहावे धर्मगुरु, कवी, योद्धा, तत्ववेत्ता आणि मार्गदर्शक गुरु गोविंद सिंह यांची २० जानेवारी रोजी तिथीनुसार जयंती आहे. त्यांचा जन्म पटना येथे झाला. तिथे त्यांनी शिखांचे धर्मस्थळ गुरुद्वारा उभारले होते. तिथेच त्यांनी गुरुग्रंथ साहेब याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता दिली. आजही शीख बांधव त्यांच्या विचारांचे पालन करतात.

सेवेत वाहून घ्या : आपले आयुष्य केवळ स्वत:साठी न जगता इतरांच्या सेवेत घालवा. गोरगरिबांना मदत करा. अडल्या-नडलेल्यांची विचारपूस करा. आत्मकेंद्री न होता, समाजभिमुख व्हा. 

गुरुबानी पाठ करा : आपल्या जीभेला चांगले वळण लावायचे असेल, तर स्तोत्रपठणाला पर्याय नाही. गुरु गोविंदांनी शीख बांधवांना गुरुबानीचा मंत्र दिला, तसा आपणही रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गीता, गीताई मुखोद्गत करून रोज पठण करू शकतो.

धर्माचे पालन करा : धर्म म्हणजे धारणा. प्रत्येकाचे जगण्याचे एक ध्येय असते. ते मिळवण्यासाठी कर्माची सांगण घालणे म्हणजे धर्माचे पालन करणे. हे पवित्र कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे.

कामचुकारपणा नको : आपले काम ही आपली ओळख बनली पाहिजे. कामातील सातत्य आपल्याला परमेश्वराच्या सेवेचा आनंद देते. म्हणून जबाबदारी झटकू नका आणि कामचुकारपणाही करू नका.

धन, तारुण्य आणि कुळाचा अभिमान बाळगू नका : या तीनही गोष्टींचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. धन अर्थात लक्ष्मी चंचल आहे, तारुण्य क्षय होणारे आहे आणि कुळ ही तुमची ओळख नसून ते तुमच्या जन्माचे माध्यम आहे, ध्येय नाही. 

अपेयपान किंवा अभक्ष्यभक्षण करू नका : धर्माने आपल्याला हिंसा शिकवलेली नाही. म्हणून शाकाहाराचा अवलंब करा. तसेच मद्याचा पेला किंवा तंबाकू आदि व्यसनादि गोष्टींचे सेवन आयुष्य संपवून टाकते. त्यांच्या आहारी जाऊ नका. सात्विक पण सकस आहार करा आणि भरपूर व्यायाम करा. 

निंदा, चुगळी किंवा मत्सर करू नका : लोकांना कोणाच्याही पाठीमागे बोलण्याची सवय असते. असे बोलणे म्हणजे अप्रत्यक्षपणे दुसऱ्याचा अपमान करणे आहे. अपमान करणे हे पाप आहे. म्हणून कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल, तर गप्प राहा पण वाईट बोलू नका.

शब्दाला जागा : आपल्या शब्दामुळे कोणाला दिलासा मिळणार असेल आणि दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करता येणार असेल, तरच शब्द द्या आणि दिलेल्या शब्दाला जागा. अर्थात वचनपूर्ती करा. अन्यथा लोक तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

अधर्मी लोकांना थारा देऊ नका : जे चूक आहे, त्याचा निषेध करा. ते असत्य आहे, त्याला विरोध करा. जो गुन्हा आहे, त्याला साम, दाम, दंड, भेद वापरून शिक्षा द्या आणि निरपराध्याला न्याय मिळवून द्या.

आपल्या कमाईचा दहावा भाग दान द्या : आपल्या हाताला दानाची सवय लागावी आणि आपल्या संपत्तीचे योग्य चयन व्हावे, म्हणून दान करण्याची सवय लावा. जगात घेणारे हात अनेक आहेत, तुम्ही देणारे हात व्हा!