शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

दोन अक्षरी राम हा जप परम, न लगे तू नेम नाना पंथ!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 11:03 IST

Shriram : ‘राम’ या दोन अक्षरी रामजपाला इतर धार्मिक नेमनियम आणि विविध पंथ यांची आवश्यकता नाही.

जन्मास आल्यानंतर जर मनुष्य रामनामाचे पठण करील तर तो एकाच फेरीत वैकुंठास प्राप्त होईल. या इहलोकात जो ‘राम राम’ असे जिव्हेने उच्चारण करील, त्याच्या जिभेवर रामनामाचा ठसा उमटेल, तो आपोआप उध्दरून जाईल. ‘राम’ या दोन अक्षरी रामजपाला इतर धार्मिक नेमनियम आणि विविध पंथ यांची आवश्यकता नाही. श्रीरामाचे चरित्र असून ते  आपल्या गोत्रातील पूर्वजांचा उध्दार करते. इतकच नव्हे तर कसं जगल पाहीजे, याची शिकवण प्रभु रामाच्या जीवन चरित्रातून मिळते. रामायण त्रेतायुगात घडले. त्यानंतर द्वापर युग झाले. आता कलियुग सुरू आहे. त्रेता युग संपण्याला हजारो वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र,कलियुगातही हजारो वर्षांचा इतिहास असलेले प्रभु श्रीराम  त्यागभावनेमुळे श्रेष्ठ ठरतात.- जीवन कसं असलं पाहीजे? जीवन हे स्वत:साठी नव्हे तर ज्योतीसारखं...,  पाण्यासारखं..., आकाशासारख... आणि मेघासारखं  दुसºयासाठी जगणारं असलं पाहीजे. समाजात जो स्वत:साठी जगतो. तो आयुष्य जगला असे अजिबात म्हणता येणार नाही. पुत्र, भाऊ, पती, मित्र, राजा, एव्हढेच नव्हे तर शत्रुही कसा असावा, हे भगवान श्रीरामांच्या जीवनचरित्रातून शिकायला मिळते. प्रभुश्रीराम दुसºयासाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगले. म्हणूनच चांगलं जगण्यासाठी प्रभु श्रीरामाच्या जीवन चरित्राचं श्रवण आणि अनुकरण करणे आवश्यक आहे. समाजात चांगल जगण्याची इच्छा असेल तर आदर्शही चांगले असणे काळाची गरज असून त्रेता युगातील प्रभु रामाचे जीवन चरित्र कलियुगातील प्रत्येकाचं जीवन सुकर करण्यासाठी उपयोगी असेच आहे.

-संकटात सामान्य मनुष्य हतबल होऊन कोसळतो. तो पिचून संपून जातो. परंतु रामायणातील प्रत्येकच पात्र संकटांना घाबरत नाही. बुजतही नाहीत. याउलट  संकटांसमोर दोन हात करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडतात. रामायणातील प्रत्येकच पात्रं, माणसे कशाच्या उर्जेवर संकटांवर मात करतात? त्यांना कुठून उर्जा आणि शक्ती मिळते? हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. मात्र, आजच्या मनुष्याच्या मनात निर्माण होणाºया प्रत्येक प्रश्नाचं रामायणाचा  त्यागाधिष्ठित पाया! हेच एकमेव उत्तर आहे.- प्रभु श्रीराम राज्यत्याग करतात, भरत सिंहासनाचा त्याग करतात. लक्ष्मण-सीता सुखासीनतेला नाकारतात. उर्मिला पतीसुख त्यागत, सासू सासºयाची सेवा करते.  हनुमंत त्यागमूर्तीच असतो. बिभीषण लंकेचा त्याग करतो. सारी वानरसेना जीवितत्याग करते, सागर अहंकाराचा त्याग करतो! तात्पर्य या सूर्यकालाच्या छायेत व प्रभु श्री रामाच्या संपर्कात जे जे येतात ते ते सर्व त्यागनगरीचे नागरिक होऊन जातात!-प्रभु श्रीरामाने सिंहासनाचा मोह सोडून पित्राज्ञा स्वीकारून थेट वनवासाचा रस्ता धरताच, कीतीर्ने त्याक्षणी त्याच्या गळ्यात जी माळ घातली ती आज व अजूनही प्रभु रामाच्याच गळ्यात टवटवीतपणे विराजित आहे. प्रभु श्रीरामाने सत्ता-संपत्ती-सुखाविलास यांचा त्याग करताच ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसलेत! प्रभु श्री रामाने पितृज्ञा म्हणून अयोध्येची वेस ओलांडली आणि रामकीर्ती कालातीत व शब्दातीत होऊन गेली. प्रभु श्रीरामांनी अयोध्येची मर्यादित भूमी सोडली व तो अमर्याद असा विश्वमानव होऊन गेले! श्रीरामाने सत्तात्याग केला, आणि ते कीर्तीसंपन्न झालेत.

-भगवान राम हे आचरणाचे दैवत आहे, हे समजून बोध घेतला पाहिजे.भगवान श्रीराम देव होते. साधू होते. मात्र, त्याही पलिकडे भगवान राम एक आदर्श मानव होते.  त्यागमय जीवनातून त्यांनी त्रेतायुगातील समाजव्यवस्थेसह आजच्या कलियुगातील समाजातील प्रत्येकाला एक बोध दिला आहे. त्यामुळे मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाचे संपूर्ण जीवनच आदर्शवत आहे.

- संत कबीर यांनी कणा-कणात रमतो तो राम. संत कबिरांच्या मते राम शब्द इतका व्यापक आहे की, परमात्मासाठी ‘राम’ हाच एकमेव शब्द आहे. -रमते इति राम:

सबमें रमै रमावै जोई, ताकर नाम राम अस होई ।घाट झ्र घाट राम बसत हैं भाई, बिना ज्ञान नहीं देत दिखाई।आतम ज्ञान जाहि घट होई, आतम राम को चीन्है सोई।कस्तूरी कुण्डल बसै , मृग ढूंढ़े वन माहि।ऐसे घट झ्र घट राम हैं, दुनिया खोजत नाहिं ।

तर प्रसिध्द उर्दू शायर अल्लामा इकबाल यांनी भगवान श्रीरामाला इमाम-ए-हिंद म्हटले आहे.है राम के वजूद पे हिंदोस्तां को नाज,!अहल-ए-नजर समझते हैं उस को इमाम-ए-हिंद!!

- अनिल गवई, तिरूपती नगर, खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकRam Navamiराम नवमी