शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

कोणाच्या परिस्थितीवरून मनस्थितीचा अंदाज बांधू नका, तो चुकू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 08:00 IST

कोणाच्या सांगण्यावरून किंवा ऐकीव माहितीवरून व्यक्ती समजून घेण्याआधी पूर्वग्रह करू नका.

एका श्रीमंत मुलाला त्याचा मोठा भाऊ वाढदिवसाच्या दिवशी त्याची आवडती महागडी कार भेट देतो. ती कार पाहून मुलगा खूपच खुश होतो. संध्याकाळी दिमाखात ही गाडी न्यायची आणि आपल्या मित्रपरिवारात ऐट मिरवायची असे तो मनोमन ठरवून टाकतो. भावाला घट्ट मिठी मारून वाढदिवसाची भेट खूपच आवडल्याचे सांगतो.

ठरवल्याप्रमाणे तो संध्याकाळी छान तयार होऊन आपल्या ब्रँड न्यू कारमध्ये बसतो. आरशात स्वत:ला न्याहाळतो आणि चावी फिरवत कार सुरू करतो. लाँग ड्राईव्हचा आस्वाद घ्यावा, म्हणून मुद्दाम वेगळे वळण घेत हायवेवरून कार सुसाट वेगाने नेतो. मित्रांचे फोन येतात, त्यामुळे अध्र्या वळणावरून कार परत शहराकडे फिरवावी लागते. 

एका सिग्नलला येऊन त्याची कार थांबलेली असताना गाडी साफ करण्याचे रूमाल विकणारा मुलगा त्याच्या कारजवळ येऊन थांबतो. त्याला बाहेरून आतले काही दिसत नसते म्हणून तो काचेवर कपाळ चिकटवून आत पाहण्याचा प्रयत्न करतो. आत बसलेला तरुण त्याला पाहत असतो. आज वाढदिवस असल्याने तो खुशीत असतो. कारची काच खाली करून त्याला विचारतो, `आवडली माझी कार? मला माझ्या मोठ्या भावाने दिली आहे. आज माझा वाढदिवस आहे.'छोटा मुलगा हसून मान डोलावतो. त्याच्या डोळ्यातले कुतुहल पाहून कारमधून सफर करणार का असे विचारतो आणि त्याला आत बसवतो. मुलाचे डोळे विस्फारतात. तो म्हणतो, `इथून जवळच एका गल्लीत कार वळवाल का? माझे घर तिथेच आहे.'

कारमधला तरुण विचार करतो, `याला नक्कीच त्याच्या मित्रांसमोर आलिशान कारमधून उतरताना ऐट करायची असणार.' असा विचार करत तो मुलाने सांगितलेल्या ठिकाणी कार वळवतो आणि एका चाळीजवळ थांबवतो. मुलगा कारमधून उतरतो आणि दोन मिनिटात येतो सांगून वर जातो. तरुणाला त्याच्या मित्रांचे वारंवार फोन येत असतात. परंतु लहान मुलाने का थांबवले असेल या विचाराने तो फोनकडे दुर्लक्ष करतो.

काही क्षणात मुलगा खाली येतो, तेव्हा त्याच्याबरोबर आणखी एक छोटा मुलगा असतो. तो त्याचा धाकटा भाऊ असतो आणि अपंग असतो. मुलगा आपल्या धाकट्या भावाला म्हणतो, `बघ, तुला म्हटलं होतं ना, अशा पण आलिशान गाड्या असतात म्हणून. जेव्हा मी मोठा होईन, श्रीमंत होईन तेव्हा मी सुद्धा तुझ्यासाठी अशी कार भेट देईन, जेणेकरून तू त्यात बसून हवे तिथे फिरू शकशील. मलाही यांच्या मोठ्या भावासारखे बनायचे आहे आणि मी नक्की बनणार!'

हे ऐकून श्रीमंत तरुणाचे डोळे पाणवतात. त्याने लहान मुलाबद्दल केलेला पूर्वग्रह चुकीचा होता, हे त्याच्या लक्षात येते आणि त्या लहान मुलामध्ये त्याला भविष्यातला आपला मोठा भाऊ दिसू लागतो. तो त्या दोघा छोट्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा करतो आणि इथून पुढे कोणाबद्दल कधीही पूर्वग्रह करणार नाही, असा पण करतो.