शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

गरुड पुरणाची निर्मिती कशी झाली तुम्हाला ठाऊक आहे? वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 23, 2021 18:54 IST

गरुड पुराण हे सामान्य जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या अनेकविध गोष्टींच्या माहितीचे हे प्राचीन संकलन होय. ज्ञानी आणि सत्यव्रती व्यक्ती कर्मकांडाशिवाय परलोकात उच्च गती प्राप्त करू शकते, याचीही वर्णने अनेक कथा व स्तोत्राद्वारा या पुराणात आली आहेत. 

अठरा पुराणात भारतीय संस्कृति आणि धर्मतत्त्वाचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे. निती, सदाचार आणि स्वातंत्र्य यांचे शिक्षण देणारे आसेतु हिमाचल शिक्षक म्हणजे पुराणे आहेत.

पुराणां सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम्उत्तम सर्वलोकानां सर्व ज्ञानोपदकम् ।।

म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्राच्या आधी पुराणांची निर्मिती केली. कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच खरी मार्गदर्शक आहेत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले.

श्री गरुड पुराण हे सामान्य जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या अनेकविध गोष्टींच्या माहितीचे हे प्राचीन संकलन होय. ज्ञानी आणि सत्यव्रती व्यक्ती कर्मकांडाशिवाय परलोकात उच्च गती प्राप्त करू शकते, याचीही वर्णने अनेक कथा व स्तोत्राद्वारा या पुराणात आली आहेत. 

गरुड पुराणाची उत्पत्ती कथा : 

मुनींनी विचारले, महामुनी व्यासांनी आपल्याला गरुडपुराण कसे सांगितले ते सांगा. सूत म्हणाले, `एकदा मी मुनींबरोबर बद्रिकाश्रमाला गेलो होतो. तेथे व्यास मुनी मला भेटले व तेथे मी त्यांना यासंबंधी विचारले होते. त्यावेळी त्यांनी मला हे गरुड पुराण सांगितले होते. व्यास मला म्हणाले होते की, एकदा ते आणि नारद दक्ष आणि भृगु इ सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना हे गरुड पुराण सांगितले.

त्यांनी सांगितले, की ते एकदा कैलास पर्वतावर गेले असता श्रीशंकर कोणत्या तरी देवाचे ध्यान करीत होते. ते कोणत्या देवाचे ध्यान करतात असे आम्ही विचारले असता, त्यांनी सांगितले, की मी भगवान विष्णूंचे ध्यान करत आहे.

भगवान विष्णु हा देहरहित आहे. अग्नि त्याचे मुख आहे. आकाश त्याची नाभी आहे. जमीन त्याचे पाय आहेत. चंद्र सूर्य त्याचे नेत्र आहेत. अशा विष्णूचे मी ध्यान करतो, असे श्री शंकरानी आम्हाला कथन केले.

हे तिन्ही लोक त्यांच्या उदरात आहेत. सर्व दिशा म्हणजे त्यांचे बाहू आहेत. पवन त्यांचा उच्छ्वास आहे. मेघ त्यांचे केस आहे. नद्या त्यांच्या अंगावरील वाहिन्या आहेत. अशा विष्णूंचे मी ध्यान करतो. 

असा हा विष्णु काळालाही भेदून जाणाराआहे. यज्ञापासून, सत्यापासून, असत्यापासून तो वेगळा आहे. ज्याचा आदिकाल नाही असा हा रूद्र देव श्वेत दीपात राहतो. त्याच्या भेटीला सर्वजण गेले असता, त्यांनी त्याला प्रणाम केला. 

भगवान हरी रुद्राला म्हणाले, `मानवाने शुद्ध आचारव्रत नियम पाळले, तर मी त्यांच्यावर प्रसन्न होतो. सर्व प्रथम गरुडपक्ष्याने भूतलावर माझी तपश्चर्या केली होती. त्याच्यावर मी प्रसन्न झालो होतो. 

तो म्हणाला, 'माझी आई विनता हिला नागांनी दासी केले आहे. आपण मला असा वर द्या की, मी देवांना जिंकून अमृत घेऊन येईन आणि आईची सुटका करीन. त्याप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी.

विष्णू म्हणाले, 'हे गरुडा, जे काही तू मागितले आहेस त्याप्रमाणे होईल. तुझ्या नावाने लोक पुराण रचतील.' अशा प्रकारे श्रीविष्णूंनी गरुडाला वर दिल्याने त्याने विष्णूंना प्रणाम केला व कालांतराने त्याच्या भक्तीचे प्रतीक म्हणून गरुडपुराण निर्माण झाले.