शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिंकणे आणि हरणे हा तर खेळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 03:02 IST

‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?

-प्रल्हाद वामनराव पैएक आजोबा आपल्या नातवाबरोबर नेहमी कॅरम खेळत असत. नातू नेहमी जिंकावा म्हणून ते मुद्दाम हरत; पण त्याच्या बाबांबरोबर खेळताना मात्र बाबा त्याला कधी जिंकू देत नसत. तो त्या बाबांबरोबर खेळताना हरायचा. हरल्यामुळे त्याला रडू यायचे. एक दिवस आजोबांनी त्याला समजावले, ‘हे बघ तू जेव्हा जिंकतोस, तेव्हा आई तुला जास्तीचे देते का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ ‘आणि जेव्हा तू हरतोस तेव्हा मी तुला उपाशी ठेवतो का?’ तो पुन्हा म्हणाला, ‘नाही’. मग त्यांनी त्याला सांगितले, ‘जिंकणे आणि हरणे हा खेळाचा परिणाम आहे. तो आपण हसत-हसत स्वीकारला पाहिजे आणि जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा तो खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे, तरच खेळाचा आनंद सतत मिळेल!’ मित्रांनो, क्रिकेटची मॅच संपल्यावर आपण टी.व्ही.वर पाहतो, हरलेल्या संघाचे खेळाडू जिंकलेल्या खेळाडूंचे हसत-हसत अभिनंदन करत असतात. खेळ म्हटला की, कोणीतरी हरणार अन् कोणीतरी जिंकणार! म्हणून हे आपल्याला खिलाडूवृत्तीने स्वीकारता आलं पाहिजे. फुटबॉलचा संघ एकदा जिंकतो. संघातील सगळे खेळाडू आनंद साजरा करत असतात; पण एवढा संघ जिंकूनही त्यातील एक खेळाडू मात्र नाराज असतो, कारण काय? तर त्या विजयी सामन्यात त्याला एकदाही चेंडू टोलवायला मिळालेला नसतो! म्हणजे संघभावनेपेक्षा वैयक्तिक आनंदाचा विचार तो जास्त करत होता. हेसुद्धा खिलाडूवृत्तीच्या अभावामुळेच होतं! मुलांनो, जीवन जगात असताना या खिलाडूवृत्तीची फार गरज असते. कारण अनेकांशी आपला रोज संबंध येत असतो. प्रत्येकाचा स्वभाव, वागणं, बोलणं वेगळं असतं; पण खिलाडूवृत्तीने आलेल्या प्रसंगाचा स्वीकार करायचा असतो. जिंकणं जसं महत्त्वाचं आहे तसंच ‘हरणं’ आनंदाने स्वीकारणंही! रडत स्वीकारलं तर त्रास होणार! हसत स्वीकारलं तर आपला अभ्यास, सराव कुठे कमी पडला, आपलं काय चुकलं, कोणतं ज्ञान मिळविलं पाहिजे, या विचाराने प्रगती नक्की साधाल!