शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
3
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
4
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
6
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
7
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
8
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
9
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
10
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
11
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
12
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
13
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
14
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
15
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
16
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
17
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
18
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
19
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
20
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

Datta Jayanti 2022: काय आहे दत्त जन्माची वेळ, जन्मकथा आणि दत्त अवतार कार्यातून घेण्याचा बोध, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:28 IST

Datta Jayanti 2022: ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, जन्मकथा गोड आहेच, पण त्यातून घेण्यासारखा बोध फार महत्त्वाचा आहे!

दत्तजन्म कथा : अतिशय महान तपस्वी अत्री ऋषी यांची पत्नी अनुसूया अतिशय सद्गुणमंडित होती. तिच्या पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ज्याचे पुण्य जास्त त्याला इंद्रपद मिळत असे. अनुसूयेच्या पतिव्रतेचे तेज पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली. त्याने तिनही देवांकडे धाव घेतली आणि आपले इंद्रपद धोक्यात आहे असे सांगितले. 

योगायोगाने तिनही देव कैलासावर एकत्र जमले होते. इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी आपली व्यथा तिघांसमोर मांडली. तीनही देवांबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नीदेखील तिथे उपस्थित होत्या. एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रिचे कौतुक कोणत्याही स्त्रिला सहन होत नाही. अनुसूयेचे कौतुक ऐकताच, तिघींनी कान टवकारले. कोण आहे ती, हे जाणून घेण्यासाठी नारदाला बोलावून घेतले. 

तीनही देवस्त्रियांची उत्सुकता पाहून नारद महर्षी अनुसूयेचे आणखीनच रसभरित वर्णन करू लागले. तिघींचे रागरंग बदलू लागले. एका क्षणाला त्यांनी नारदाला हटकले व म्हणाल्या, `पुरे झाले कौतुक. आम्हा तिघींपैकी कोणी स्त्री या विश्वात श्रेष्ठ असूच शकत नाही.' यावर नारद म्हणाले, `ठीक आहे, घ्या तिची परिक्षा!'

तिघी एकासूरात `घेणारच' असे म्हणाल्या आणि तिघींनी त्रिदेवांकडे कटाक्ष टाकला. तिघींनी फर्मान सोडले, `आता ताबडतोब जा आणि कोण अनुसूया आहे, तिची परीक्षा घ्या.' त्रिदेवांनी समजूत काढली, पण कोणी ऐकायला तयार होईना. बायकोचा हट्ट पुरवावा लागणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर, भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले. अत्रि ऋषी आश्रमात नाहीत, हीच वेळ जाण्यासाठी योग्य आहे, अन्यथा कितीही वेशांतर करून गेलो, तरी ते आपल्याला निश्चित ओळखतील, हे विष्णूंना ठाऊक होते. त्रिदेव जाण्यासाठी निघाले, तोच त्यांच्या पत्नी म्हणाल्या, `साधी परीक्षा नाही, सत्वपरीक्षा घ्या!'

देवींना काय सुचवायचे आहे हे लक्षात घेऊन त्रिदेव अलख निरंजन म्हणत साधूंच्या वेषात अत्रि ऋषींच्या आश्रमाबाहेर आले. अतिथींचा आवाज ऐकताच अनुसूया जोंधळे घेऊन अन्नदान करायला बाहेर आली. त्या तेज:पूंज अतिथींना पाहून स्तिमीत झाली. ती दान देणार, तेवढ्यात विष्णूंनी तिला विवस्त्र होऊन अन्न द्यावे, अशी मागणी केली. 

एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचे धाडस कोणत्या साधूंमध्ये असावे? असा विचार करत अनुसूयेने अत्रि ऋषींचे स्मरण केले. तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता, तसेच विवस्त्र होऊन पातिव्रत्यही भंग होऊ द्यायचे नव्हते. या समस्येचा मध्य काढताना अनुसूया मनातल्या मनात म्हणाली, अशी मागणी करणारे सामान्य साधू नाहीत. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईन, पण त्यांनीदेखील माझे बाळ झाले पाहिजे, कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माते असा केला होता.' अशा विचाराने तिने आपल्या पतीचरणांचे उदक घेऊन अतिथींवर शिंपडले आणि तिच्या तपसामर्थ्याने ती तिघेही बालके झाली. त्यांना पाहून अनुसूयेचा वात्सल्याने ऊर भरून आला. तिने शर्थ पूर्ण केली आणि बालकांचे पोट भरल्यावर पाळणा बांधून झोपवले. अत्रि ऋषी परत आल्यावर तिने सगळी हकीकत सांगितली.

स्वर्गलोकात तिनही देवस्त्रिया पतीची वाट पाहू लागल्या. नारद महर्षींनी सर्व वृत्त कथन केले. आपले पती आता मोठे झाल्यावर परत येणार हा विचारच त्यांना सहन झाला नाही. अनुसूयेच्या पतीव्रतेसमोर तिघी जणी नतमस्तक झाल्या. आपला अहंकार दूर ठेवून त्या अनुसूयेला शरण आल्या आणि आपला पती परत मागू लागल्या. अनुसूयेने पती चरणोदक शिंपडून बाळांना पूर्ववत केले परंतु तिचा पाळणा रिकामा झाला. तेव्हा, तिच्यावर प्रसन्न होऊन तीनही देवांनी अनुसूयेच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला. त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्यावेळी (सायंकाळी ६.४०) दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा अंश चंद्र, विष्णूंचा अंश दत्तात्रेय आणि शंकराचा अंश दूर्वास अशी तिनही बालके अनुसूयेच्या आणि अत्रि ऋषींच्या छत्रछायेत वाढू लागली.

दत्तजन्म जन्मवेळ : म्हणून आजही मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी ६.४० रोजी दत्त जन्म घोषित करतात आणि भजन, कथा, कीर्तन करून उत्सव साजरा करतात. 

दत्त कथेचा बोध : अनुसूया माता जशी असूयाशून्य होती, तसा आपण कोणाबद्दलही राग, मत्सर, द्वेष भाव न ठेवता सर्वांशी सद्भावनेने वागले तर आपल्या पोटी दत्त गुरूंसारखे वैराग्य येऊन प्रपंच आणि परमार्थाची व्यवस्थित घडी बसवता येईल.