शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिकतेची संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 04:22 IST

कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

-सद्गुरू जग्गी वासुदेवमानवी बुद्धीने जीवन आणि त्यापलीकडे काय आहे, याचा शोध घेणे स्वाभाविक आहे.ङ्क्तजीवनाचे अवलोकन करणे आणि ते जाणून घेण्यासाठी आतुर असणे. वास्तविकता अशी असताना, तुम्ही अध्यात्म कसे टाळू शकता? दीर्घकाळापासून तुम्ही हे टाळत आला आहात. कारण जे तुम्ही नाही, अशा अनेक गोष्टींप्रती तुम्ही आसक्त झाला आहात आणि तुमची ओळख बांधली आहे. जेव्हा मी ‘जे तुम्ही नाही अशा गोष्टी’ असे म्हणतो, तेव्हा त्यात तुमचे शरीर आणि मनही सामील आहे. एकदा तुम्ही ‘जे नाही’ अशा गोष्टींसोबत तुमची ओळख बांधली की तुमची बुद्धी विकृत होते आणि मग ती काहीही स्पष्टपणे पाहू शकत नाही. कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

समजा तुम्ही म्हणालात, ‘मी एक स्त्री आहे.’ मग तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या भावना, सर्वकाही एका स्त्रीसारखे असणार. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या काही अवयवांसोबत तुमची ओळख जोडली. यासाठीच ‘आध्यात्मिक प्रक्रिया’ आवश्यक ठरतात. जर लोक सहज, निरागस असते तर अध्यात्म ही एक नैसर्गिक गोष्ट असली असती. तुमच्या सभोवताली दृष्टिक्षेप टाकणे आणि जीवनाच्या भौतिकतेच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव होणे फार स्वाभाविक आहे आणि हे जाणून घेणेही फार सोपे आहे; पण जगातील बहुतेक लोकांच्या हे लक्षात येत नाही ही आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही जर फक्त दोन मिनिटांसाठी डोळे बंद केले तर पाहाल की, तुम्ही शरीरापेक्षा जरा अधिक काहीतरी आहात हे लक्षात येईल. एक प्रकारे, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे की, आपल्याला लोकांना त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल आठवण करून द्यावी लागत आहे. आम्हाला आध्यात्मिक प्रक्रि या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा अशी इच्छा आहे. एक आई आपल्या मुलाला दात घासण्यास शिकविते त्याप्रमाणे, आपल्याला आध्यात्मिक प्रक्रियाही तशी व्हायला हवी आहे, कोणत्याही प्रयत्नांशिवाय.