शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आधी स्वत:ला तपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 02:10 IST

ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.

- मोहनबुवा रामदासीएक भक्त होता. तो प.पू. गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला ‘महाराज! हा समाज सुधारला पाहिजे हो! ही समाजाची दु:ख वेदना पहावत नाहीत हो! आपणच काहीतरी करा.’ प.पू. महाराजांनी त्याचे ते आवेशपुर्व बोलणं ऐकले आणि एवढेच म्हणाले, ‘समाजातील दु:खे योग्य वेळी कमी होतीलच. पण समाजातील ही दु:खे तुला खरेच कमी व्हावीत असे वाटत असेल तर तू तुझ्या दु:खाची भर त्यात टाकू नकोस...’ म्हणून यासाठी समर्थही म्हणतात ‘पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।’ कोणत्याही समाजसुधारणेचा मूळ ज्ञानाचा अंकूर प्रत्येकाच्या अंत:करणात असतो. त्याचे संवर्धन विवेकसंपन्नतेने करता येणे अवश्यक आहे. दुसऱ्याला तपासण्यातच माणूस स्वत:ची युक्ती, शक्ती आणि बुद्धी वाया घालवतो. समर्थांनी समाजसुधारणेचा संकल्प रामापुढे केला व सुरवात स्वत:पासून केली. ते म्हणतातकेल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहीजे।यत्न तो देव जाणावा। अंतरी धरता बरे।।समाज सुधारणेसाठी समर्थांचे खूप बोलके विचार पहा.शरीर परोपकारी लावावे। बहुतांचे कार्यास यावे।उणे पडो नेदावे। कोणी एकाचे।आडले जाकसले जाणावे। यथानुशक्ती कामास यावे।मृदूवचने बोलीत जावे। कोणी एकासी।।दुसºयाच्या दु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।प्राणीमात्रास मेळवून घ्यावे। बºया शब्दे।।ही समर्थांची समाजसेवेची गीता आहे. म्हणून पंपू गोंदवलेकर महाराजही म्हणतात : ज्याने समाजसेवेचे व्रत घेतले असेल त्याने स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात त्या रामरायाचेच अस्तित्व आहे, या श्रद्धेने समाजसेवा करावी.समाजसेवा हीच खºया अर्थाने ईश सेवा असते. ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.