शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांच्या पलीकडे जाऊन नाती जोडून येतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:53 IST

जिथं नातं असत तिथ अपेक्षा असते. बहुतांश लोकांच्या अपेक्षा अश्या असतात की या पृथ्वीवरची कोणतीही व्यक्ती त्या तो कधीच पूर्ण करू शकणार नाही.

सद्‌गुरू: बहुतांश लोकांना ते त्यांचे आयुष कश्याप्रकारे जगतात हे त्यांच्या नात्यांच्या दर्जेवर निर्भर असते. जर हा घटक आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची भूमिका बजावत असेल तर या कडे आपण नीट लक्ष दिले पाहिजे. तर या नात्यांचा आधार काय? त्या नात्यांची माणसाला गरज का भासते? नाती ही भिन्न-भिन्न स्तरांवर बनतात; वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्याशाठी वेगवेगळ्या प्रकारची नाती. तुमच्या गरजा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय अश्या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात.  नाते हे कसेही-कुठल्या ही प्रकारचे असोत, पण महत्वाचा घटक हाच आहे की त्या नात्यात तुमची गरज पूर्ण होते. “नको...मला माझ्यासाठी काहीही नको, मला फक्त इतरांना द्यायचय.” “देणे” हा गुण सुद्धा “घेणे” या सारखाच गरजेचा भाग आहे. “मला कुणाला तरी काहीतरी द्यायचं आहे” ही भावनासुद्धा “मला काहीतरी मिळवायचं आहे” या सारखीच गरजेचा भाग आहे. ही गरज आहे. गरजा जश्या वेगवेगळ्या असू शकतात त्याचप्रकारे नातीसुद्धा भिन्न भिन्न असू शकतात. माणसांच्या गरजा वाढण्याचे कारण म्हणजे स्वतःमध्ये असणाऱ्या अपुरेपणाची जाणीव. आणि ही अपुरेपाणाची जाणीव घालवून तो परिपूर्ण बनण्यासाठी नाते-संबंध बनवतो. जेव्हा तुमचे तुमच्या प्रिय व्यक्तीशी घनिष्ट संबंध असतात, तेंव्हा तुम्हाला परिपूर्ण वाटते. पण जर संबंध बिघडले तर तुमच्यात अपुरेपणाची भावना निर्माण होते. हे असे का बर? या आपल्या जीवांनाच पूर्णपणे स्वतंत्र स्वतःचं असं एक अस्तित्व आहे. मग हा अपुरेपणाचा भाव का? का हा जीव दुसऱ्या जीवाशी भागीदारी करून परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतो? याचे मुळात कारण हे आहे की आपण या जीवाची पूर्णपणे सधनता व परीमापण जाणून घेतलेल नाही. जरी हा एक मुख्य घटक आहे तरी नात्यांची प्रक्रिया किचकट आहे.

अपेक्षांचं स्रोत

जिथं नातं असत तिथ अपेक्षा असते. बहुतांश लोकांच्या अपेक्षा अश्या असतात की या पृथ्वीवरची कोणतीही व्यक्ती त्या तो कधीच पूर्ण करू शकणार नाही. विशेषकरून स्त्री आणि पुरुष मधील संबंध. अपेक्षा एवढ्या असतात की जर तुम्ही अक्षरश: देवाशी किंवा देवीशी जरी लग्न केलंत तरी ते सुद्धा तुम्हाला निराश करतील. जोपर्यंत तुम्हाला अपेक्षाबद्दल किंवा त्यांच्या मुळाबदल काही समजणार नाही, तो पर्यंत तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. पण जर तुम्हाला कळले की अपेक्षांचा स्रोत काय आहे, तुम्ही एक खूप सुंदर भागीदारी बनवू शकता.

मुळातच तुम्ही नात्यांच्या शोधत का असता? कारण..... तुम्हाला जाणवेल की नात्याविना तुम्ही खचता. तुम्हाला सुखी राहायचं असतं, आनंदी राहायचं असतं. म्हणून तुम्ही नाती शोधता. किंवा जर वेगळ्या शब्दात सांगायचं झाला तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना तुमच्या आनंदाचा स्रोत बनवण्याचा प्रयत्न करत असता. जर तुम्ही मुळातच स्वत:हून आनंदी असाल, नाती ही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्याचे माध्यम ठरेल, न की आनंद मिळवण्याचे साधन. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचे दमन करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल आणि समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्याशी हेच करत असेल तर हे नातं काही काळानंतर त्रासदायी ठरणार आहे. सुरुवातीला हे ठीक वाटेल कारण काहीतरी गरजा पूर्ण होत आहेत. पण जर तुम्ही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी नाती बनवत असाल तर तुमच्याबद्दल कोणीसुद्धा गाऱ्हाणे घालणार नाही, कारण तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत आहात, न की दुसऱ्या व्यक्तीकडून आनंद मिळवण्याचा.

जर तुमचं आयुष्य हेच आनंद अभिव्यक्त करत असेल न की आनंदाच्या शोधत, तर , नाती ही साहजिकच विस्मयकारक ठरतील. तुम्ही असंख्य नाती बनवू शकता आणि ती जपू ही शकता. ही सगळी दुसर्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची करामत आहे ना.....,याची गरजच भासणार नाही. कारण जर तुम्ही आनंदाची अभिव्यक्ती करत असाल तर त्यांनाही तुमच्या बरोबर राहण्याची इच्छा असेल.

जर तूम्हाला वाटत असेल की तुमचे नाते तग धरून राहावे , तर तुमचे आयुष्य हे सुख शोधणारे नसून आनंद व्यक्त करणारे झाले पाहिजे.