शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाचे काही फायदे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:17 IST

आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता भासत नाही. आणि कोणताही त्रास न होता, या दिवशी आपण अन्नसेवन न करता राहू शकता.

सद्गुरु: आपल्याला बळजबरीने उपास करायला न लागणे महत्वाचे आहे. आपण जर शरीराच्या नैसर्गिक चक्राकडेलक्ष देऊन पाहिले, तर त्यामध्ये मंडला म्हणून एक चक्र असते. मंडल म्हणजे प्रत्येक 40 ते 48 दिवसांनी आपली शरीर प्रणाली एका विशिष्ट चक्रातून जाते. प्रत्येक चक्रात तीन दिवस असे असतात जेंव्हा आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता नसते. आपले शरीर कसे कार्यरत आहे याविषयी आपण जर जागरूक असाल, तर आपल्या असे लक्षात येईल की या दिवसांमध्ये आपल्या शरीराला अन्नाची आवश्यकता भासत नाही. आणि कोणताही त्रास न होता, या दिवशी आपण अन्नसेवन न करता राहू शकता.आपण जर सतत चहा किंवा कॉफी घेत असाल, आणि जर आपण उपवास केलात, तर तुमच्यासाठी ते अतिशय त्रासदायक होईल; उपवास करणे अतिशय कठीण होईल. म्हणून आपल्याला जर उपवास करायचा असेल, तर प्रथम योग्य प्रकारचा आहार घेऊन आपले शरीर उपवासासाठी तयार करा.प्रत्येक 11 ते 14 दिवसांनी एकदा तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा होणार नाही. त्या दिवशी आपण काहीही खाऊ नये. ही जाणीव कुत्रे आणि मांजरांमध्ये सुद्धा असते याची आपल्याला कल्पना आहे का? एखाद्या विशिष्ट दिवशी ते काहीही खात नाहीत हे आपल्या कधी लक्षात आले आहे का? त्यांना त्यांच्या शरीराची जाण असते. ज्या दिवशी शरीर सांगते, “अन्न नको”, म्हणजे तो स्वच्छतेचा दिवस आहे, त्या दिवशी ते काहीही खात नाहीत. तुमच्यामध्ये ही जाण नसल्यामुळे एकादशी म्हणजे उपवासाचा दिवस ठरविला गेला.चंद्र दिनदर्शिकेनुसार प्रत्येक 14 दिवसांनंतर एकादशी येते. 14 दिवसांमध्ये किमान एक वेळा तरी तुम्ही अन्नग्रहण थांबवू शकता. आपल्याला जर अन्नग्रहण केल्यावाचून राहता येत नसेल, किंवा तुमची दिनाचर्या कठीण परिश्रमांची असेल, आणि उपवास सहन करण्यायेवढी आवश्यक अशी साधनेची बळकटी नसेल, तर आपण फळे खाऊन उपवास करू शकता. फक्त तुमच्या शरीर यंत्रणेचे बारकाईने निरीक्षण करा आणि तुमच्या असे लक्षात येईल, की काही ठराविक दिवशी, तुम्हाला काहीही खाण्याची गरज भासत नाही. त्या दिवशी बळजबरीने अन्नग्रहण करणे ही चांगली गोष्ट नव्हे. तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांची पुरेशी तयारी केल्याशिवाय जर बळजबरीने उपवास केला, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसानच होईल.समजा एखाद्या व्यक्तीला काही निश्चित काळासाठी उपवास करायचा आहे, तर त्याला योग्य प्रकारच्या आध्यात्मिक प्रक्रिया किंवा साधना यांची जोड देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे शरीर आणि मन यांना पुरेसे तयार न करता, जर बळजबरीने उपवास केला, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसानच होईल. परंतु जर तुमचे शरीर त्यासाठी योग्य प्रकारे तयार केलेले असेल, आणि तुमचे मन एका खास अवस्थेत असेल, तुम्ही जर तुमची ऊर्जा उत्तमरित्या सक्रीय ठेवली असेल, तर उपवासाचे अनेक फायदे होतील.तुम्ही जर सतत चहा किंवा कॉफी घेत असाल, आणि जर तुम्ही उपवास केलात, तर तुमच्यासाठी ते अतिशय त्रासदायक होईल; उपवास करणे अतिशय कठीण होईल. म्हणून आपल्याला जर उपवास करायचा असेल, तर प्रथम योग्य प्रकारचा आहार घेऊन आपले शरीर उपवासासाठी तयार करा. तुम्ही खाण्याची इच्छा रोखून धरणे तुमच्यासाठी अत्यंत त्रासदायक होत असेल, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराचे केवळ नुकसानच करून घ्याल. कदाचित तुम्हाला एखादी सिद्धी करून दाखवायची असेल, “मी तीन दिवस काहीही खाल्ले नाही.” आणि सार्‍या जगाला हे ओरडून सांगायचे असेल, तर कृपया तसे काही करू नका. त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त तुम्हाला अशक्त बनवाल, येवढेच. आपले शरीर जाणून घेणे आणि आपल्या शरीर यंत्रणा कशी काम करते, आणि आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे याची सखोल जाणीव करून घेणे हे अशा गोष्टी करण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.प्रत्येक व्यक्तीसाठी उपवास करणे चांगलेच असेल असे नाही, परंतु यामागची योग्य, सखोल जाणीव करून घेऊन उपवास केले तर त्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून आपल्या शरीर यंत्रणेसाठी योग्य आणि सुसंगत पद्धत काय आहे हे शोधणे आणि त्यानुसार उपवास करणे उत्तम.