शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 29, 2020 07:30 IST

Adhik Maas 2020: समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. तेव्हापासून भगवान विष्णुंनी आपल्या हातात शंख धारण केला. 

ठळक मुद्देशंख असतो तेथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, अशी हिंदूंची धारणा आहे. महाभारतात युद्धभूमीवर शंखध्वनीने युद्धाला सुरुवात झाली. उजवीकडे वळलेला शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात. 

ज्योत्स्ना गाडगीळ. 

भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला. शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेले. मंगलकार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. एवढे शंखाला महत्त्व मिळाले, ते का, कशामुळे, हे सविस्तर जाणून घेऊ. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

विष्णुंनी हाती शंख घेतला, त्याची कथा :

त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे।असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते।।

समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून 'शंख' तिचा भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते, की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. म्हणून भगवान विष्णुंनी आपल्या हातात शंख धारण केला. 

धर्मशास्त्रातील शंखाचे महत्त्व : 

हिंदू धर्मशास्त्र अभ्यासक सुधा धामणकर शंखाचे महत्त्व आणि त्याची महती सांगतात, हिंदूंच्या देवळात देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात. देवतापूजनाचे आधी शंखाचीच पूजा असते. हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच, देवाजवळचा शंख आहे. सर्व मंगलकार्यात शंखनाद करणे पवित्र मानले जाते. युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठमोठ्याने शंखाचा आवाज काढतात. भगवद्गीतेत याचा उल्लेख आला आहे.  लहान मुलाची प्रकृति सुधारण्यासाठी, त्याचे आयुष्य वाढण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख, मंत्रसंस्कार करून बांधत असत. शंखभस्म आयुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे.

हेही वाचा: Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती

'शंख' शब्दाची व्युत्पत्ती :

श खनति अशी शंख शब्दाची फोड कोशकार करतात. जो कल्याण निर्माण करतो, दारिद्र्य घालवतो, तो शंख. मंदिरामधून देवताना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनाद पूर्वी करीत शंखामध्ये पाणी  किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात. स्नान घालतात. देवतांचे तीर्थ घेऊन `गंगा' अंगावर घेतली, या पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात.

देवीला 'शंखिनी' म्हणतात : 

देवीला शंख आवडतो, म्हणून तिनेही आपल्या अन्य आयुधांबरोबर शंखही धारण केला आहे. देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासूरांचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली, म्हणून तिला 'शंखिनी' म्हणतात.

शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व: 

महाभारतात युद्धाचेवेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची. 

भारताच्या पुरातन इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते, मांगल्याचे प्रतीक होते. आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंगी गोलसर, स्वच्छ चकचकीत, सुंदर शंख हा रत्न मानतात. उजवा शंख व डावा शंख असे शंखात प्रकार आहेत. ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात. उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात. 

शंख असतो तेथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, अशी हिंदूंची धारणा आहे. म्हणून विष्णू पुजेत शंखपूजेला महत्त्व असते.

हेही वाचा: Adhik  Maas 2020: दारात तुळशी वृंदावन लावा, लक्ष्मीसोबत लक्ष्मीपतीही येतील!

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना