शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 14, 2020 09:07 IST

Adhik Maas 2020: आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही. 

ठळक मुद्दे'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' हा स्वधर्म माऊलींनाही अपेक्षित आहे. गावच्या देवळातल्या मूर्तीसमोर गावगड्याने घातलेले मालवणी गाऱ्हाणे, हीदेखील वैश्विकप्रार्थनाच नव्हे का?

ज्योत्स्ना गाडगीळ

'अधिकस्य अधिकम फलम्' असे म्हणत, अधिक मासात महिनाभर आपण विविध तऱ्हेने  पूजा अर्चना करीत, देवाकडून स्वत:साठी बरेच काही मागून घेतले. पुण्यसंचय केला. आजपासून तीन दिवस, साऱ्या विश्वावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून दान मागुया. असे दान,जे माऊलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले, 'पसायदाना'च्या रूपाने!

आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,तोषोनि मज द्यावे, पसायदान हे।।

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ९००० ओव्यांचा वाक् यज्ञ केल्यावर, त्याची सांगता करत असताना ९ ओव्यांमध्ये  भगवंताकडे मागणे मागितले. स्वत:साठी का? नाही...तर विश्वासाठी! हेच संतलक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, साधू-संतांनी जेव्हा जेव्हा भगवंताकडे याचना केली, त्यात कधी स्वार्थ नव्हताच, तर केवळ 'समष्टी'साठी प्रार्थना होती. आठवून पहा...

आरती झाल्यावर आपण एक भला मोठा श्लोक म्हणतो, त्याला 'मंत्रपुष्पांजली' म्हणतात. तो पाठ करून, घोकून, रेटून, आवाजाची चढाओढ करून म्हणताना जेवढी गंमत वाटते ना, तेवढीच त्याचा अर्थ जाणून घेतल्यावरही वाटेल. 'पृथ्वीव्यै समुद्रपर्यंता या एकराळिती' केवढा दूरचा विचार ऋषींनी करून ठेवला आहे. आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही. 

हेही वाचा: तुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा!; माऊलींची माऊलीने काढलेली समजूत.

तीच बाब, गाऱ्हाण्याची...गावच्या देवळातल्या मूर्तीसमोर गावगड्याने घातलेले मालवणी गाऱ्हाणे, 'बा देवा म्हाराजा, जगाच्या नाथा, रवळनाथा' म्हणत गावच्या प्रत्येक घरासाठी केलेली प्रार्थना आणि इतरांनी 'व्हय म्हाराजा' म्हणत दिलेली पुष्टी हीदेखील वैश्विकप्रार्थनाच नव्हे का...?

देवासमोर उभे राहिलो, की आपले हात फक्त आपल्या सुख शांतीसाठी जोडले जातात. परंतु, हा आपला धर्मसंस्कार नाही. 'सर्वेपि सुखिन: सन्तु:' अर्थात सगळे सुखी झाल्याशिवाय मी सुखी होऊच शकत नाही, हे समाजभान आपल्याला संतांनी करून दिले आहे.

पसायदानातही माऊली विश्वात्मक देवाला आर्जव करते, माझ्याकडून जो वाग्यज्ञ करवून घेतलास, त्यात सारे काही सांगून झाले आहे आणि आता मागायची वेळ आली आहे. हे मागणे माझ्या एकट्यासाठी नसून अखिल विश्वासाठी आहे, ते तू पूर्ण कर. तोषावे म्हणजे तृप्त हो आणि तृप्त होऊन मी जे सर्वांसाठी मागतोय, ते पसाय म्हणजे प्रसादरूपी दान आमच्या पदरात घाल.

जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे 

माऊलींना माहित आहे, आजवरचा इतिहास पाहता सृष्टीत सत्व-रज-तम वृत्तीचे लोक वारंवार निपजत असतात. म्हणून पृथ्वीवरील वातावरण संतुलित आहे. यातील तम वृत्ती सर्वांचे अहित योजणारी असते. देवा-दानवांपासून, थोर राष्ट्रपुरुषांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी दुष्टांचा नायनाट केला, परंतु दुष्ट वृत्ती शिल्लक राहिली. म्हणून माऊली म्हणते, जे खल आहेत, म्हणजे वाईट लोक आहेत, त्यांची व्यंकटी सांडो...व्यंकटी म्हणजे वाईट वृत्ती, तीच 'सांडो'... शब्दांचा किती चपखलपणे वापर केला आहे पहा, 'सांडो' म्हटले आहे,  'जावो' म्हटले नाही. कारण, गेलेली गोष्ट परत येऊ शकते, परंतु सांडलेली गोष्ट पुनर्वापरात आणू शकत नाही. म्हणून खलवृत्ती सांडून गेली, की पुन्हा आचरणात येणार नाही. 

एकदा का वाईट वृत्ती नष्ट झाली, तर उरतील फक्त चांगले लोक. जे समष्टीचा विचार करतील, ज्यांच्या ठायी भूतदया असेल, परस्पर प्रेम असेल, सद्भावना असेल, ते केवळ चांगल्या कार्यासाठीच प्रवृत्त होतील, त्यांच्या हातून चांगलीच कामे घडतील आणि या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे विश्व अतिशय सुंदर होईल. कारण येथील प्रत्येक जीवाला, दुसऱ्या जीवाप्रती सहानुभूती असेल. असे खरोखरच घडले, तर काय होईल, ते पाहू उद्याच्या भागात...!

जय हरी माऊली।

हेही वाचा : Adhik Maas 2020: भगवान विष्णूंना आवडणारी आठ फुले कोणती?; सांगताहेत सुधा मूर्ती

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना