शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

नामस्मरणाच्या सरावातून निरपेक्ष प्रेम करता येते- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 07:20 IST

प्रपंचातले जे आपलेपण आहे, ते भगवंताकडे वळवावे. घरातल्या माणसांवर नि:स्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिकावे. ते जमले म्हणजे परमार्थ आपोआप साधेल.

प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी असे आपण सांगतो. त्यांच्यावर प्रेम कसे करावे, हे कुणी शिकवावे लागत नाही. एकदा 'आपले' मानले, की प्रेम आपोआप निर्माण होते. पण हे प्रेमही खरे पाहिले, तर स्वार्थी आहे. एक गृहस्थ मला भेटले. मी त्यांना विचारले, `झाले का मुलाचे लग्न?' ते म्हणाले, `नाही उद्या आहे.', `मुलगा चांगले वागतो का?', हे विचारल्यावर ते म्हणाले, 'आता नाही, सहा महिन्यांनी सांगतो.'

हेही वाचा : बोलताना जरा सांभाळून, शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते!

स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत असेल, तर प्रेमाचे सुख कसे लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावे आणि निरपेक्षपणे प्रेम करायला शिकावे. खरोखरच प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. उच्च शिक्षण पुरे करण्यासाठी तिथे काही काळ शिकावे लागते. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो. फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते किती उपयोगी पडेल व त्यापासून किती फायदा होईल ही अपेक्षा ठेवायची नसते, त्याप्रमाणे प्रपंच ही प्रयोगशाळा समजावी.

मनुष्य जन्मभर जो व्यवसाय करतो, त्याच्याशी तो एकरूप होऊन जातो. नोकरी करणारा माणूस आपल्या नोकरीशी इतका एकरूप होतो की, स्वप्नातही तो स्वत:ला नोकर समजून राहतो. कर्म कसे करावे, तर त्याच्यापासून वेगळे राहून. लग्नाचा सोहळा भोगावा. लाडू खावेत, पण ते दुसऱ्याचे आहेत हे लक्षात ठेवून खावेत.

आतापर्यंत आपला अनुभव पाहिला, तर आपण केले असे फारच थोडे असते, म्हणून परिस्थितीबद्दल फार काळजी करू नये. आपण आपले कर्तव्य योग्य रीतीने करावे. आपल्या वत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ यावी लागते. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्तकाळ  घडी, आल्याविण! हे ध्यानात ठेवावे. तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करावे. भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, असे म्हणावे. मग आपोआप भगवंताचे प्रेम लागेल.

प्रपंचातले जे आपलेपण आहे, ते भगवंताकडे वळवावे. घरातल्या माणसांवर नि:स्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिकावे. ते जमले म्हणजे परमार्थ आपोआप साधेल. आपलेपना भगवंताकडे वळवला म्हणजे भगवंतावर प्रेम जडेल. त्यासाठी काही वेगळे करायला नको. फणस चिरताना हायाला तेल लावून तो कापावा लागतो व त्यातले गरे काढावे लागतात. मग हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. देवाचे नाव घेऊन प्रपंचात व्यवहार केला, म्हणजे अहंकाराचा चीक न लागता, ईश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या छोट्या होड्या पाण्यात सोडतात. एखादी होडी तरली, तरी हसतात, बुडाली तरी हसतात. तशीच प्रपंचातली सुख-दु:खे हसत खेळत झेलावीत. हे सारे नामस्मरणाने साधते. 

हेही वाचा : चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते का? वाचा ही बोधकथा!