शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

अंबाजोगाई : बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील. यासाठी तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे, असे ...

अंबाजोगाई : बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील नवी आव्हाने पेलू शकतील. यासाठी तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा आंतरभारतीचे राष्ट्रीय महासचिव अमर हबीब यांनी व्यक्त केले.

येथील नगरपरिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आंतरभारती अंबाजोगाई शाखेच्यावतीने राजू जांगीड यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी अमर हबीब बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले, तर अध्यक्षा म्हणून प्रा. डॉ. अलका वाळचाळे या उपस्थित होत्या.

अमर हबीब पुढे म्हणाले की, समाजातील तरुणांनी प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून येणारे नवनवे बदल स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तरुणांनी सतत प्रवाही राहिले पाहिजे. विभिन्न जाती-धर्म, भाषा, प्रांतातील लोकांना एकत्र आणून माणसांचा समूह निर्माण करण्यासाठी आंतरभारतीची निर्मिती झाली असून, हे सूत्र प्रचलित करण्यासाठी आंतरभारती अंबाजोगाईने स्नेहसंवर्धन पुरस्काराची सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा पुरस्कार हा भारतातील एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्नेहसंवर्धन या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित केलेल्या शंकर मेहता, प्राचार्य बी. आय. खडकभावी, प्राचार्य एम. बी. शेट्टी, आनंदराव अंकाम यांच्याहस्ते राजू जांगीड यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा आणि मिलिंद बोकील व अमर हबीब यांनी संपादित केलेले "धुन तरुणाई" हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राजू यांच्या पत्नीचा डॉ. अलका वालचाळे यांनी साडी-चोळीचा आहेर करून सत्कार केला.

वैजनाथ शेंगुळे आणि अनिकेत डिघोळकर यांनी गायिलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनिकेत दिघोळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पद्माकर घोरपडे यांनी सन्मानपत्र वाचन केले. राजू जांगीड यांचा परिचय संतोष मोहिते यांनी करून दिला. संचालन ज्योती शिंदे यांनी केले, तर आभार दत्ता वालेकर यांनी मानले.

160821\img-20210816-wa0032.jpg

स्नेहवर्धन पुरस्कार वितरण