शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये खोटी फिर्याद देऊन ‘त्या’ महिलेकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:33 IST

बँकेतून पैसे काढून बाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपल्याला मारहाण करून हातातील बॅग हिसकावून घेत लाख रुपये पळविल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती; परंतु ही फिर्याद खोटी असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे अधीक्षक कार्यालयासमोर पैसे पळविल्याची फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बँकेतून पैसे काढून बाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपल्याला मारहाण करून हातातील बॅग हिसकावून घेत लाख रुपये पळविल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती; परंतु ही फिर्याद खोटी असल्याचे समोर आले असून, सदरील महिलेने पोलिसांची दिशाभूल केली आहे. यामागचे कारण पोलीस शोधत आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेतून एका महिलेजवळील काढलेले १ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. ऐन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लुटीची घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. हे तपास तात्काळ लावण्याचे मोठे आव्हान शिवाजीनगर पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक व शिवाजीनगर पोलिसांची विशेष पथके याकामी नेमली गेली. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता; परंतु वास्तव मात्र काही वेगळेच असल्याचे तपासातून निष्पन्न झाले.

पैसे काढलेच नाहीततपास अधिकारी एस.डी. पठाण यांनी सदरील महिलेचे बँक स्टेटमेंट काढले. त्यात या महिलेने पैसेच काढले नसल्याचे समोर आले. फिर्यादीत मात्र महिलेने आपण बँकेच्या खात्यातून काढलेले पैसे लंपास केल्याचाचा स्पष्ट उल्लेख आहे. स्टेटमेंट व फिर्यादीत तफावत आढळून आल्याने हा सर्व प्रकार पोलिसांची दिशाभूल करून धावपळी करण्यासाठीच होता, असे प्रथमदर्शनी समोर आले आहे. खोटी फिर्याद देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी सदर महिलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.गुन्हा दाखल केला जाईलसदरील महिलेचे बँक स्टेटमेंट काढले असता त्यात १ लाख रुपये विथड्रॉल झालेच नाहीत. विशेष म्हणजे दिवसभर केवळ एका व्यक्तीने लाख रुपयांच्या वर रक्कम बँकेतून काढली आहे. सदरील महिलेने पोलिसांची दिशाभूल केल्याचे दिसते. त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध घेत आहोत. दिशाभूल केल्याप्रकरणी सदरील महिलेवर लोकसेवकाला खोटी माहिती देणे या आरोपाखाली कलम १८२ प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल.- एस.डी. पठाण, सहायक पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर, बीड.