शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गांडूळ खताने दिला गोशाळा चालकास आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST

पुरुषोत्तम करवा खताचा शेतकऱ्यांना होऊ लागला फायदा : गोशाला चालविण्यासाठी होतेय कसरत माजलगाव : सद्य:स्थितीत गोशाळा चालवणे जिकरीचे काम ...

पुरुषोत्तम करवा

खताचा शेतकऱ्यांना होऊ लागला फायदा : गोशाला चालविण्यासाठी होतेय कसरत

माजलगाव : सद्य:स्थितीत गोशाळा चालवणे जिकरीचे काम झाले आहे. असे असताना माजलगाव येथील कमलबाई रामनिवास मुंदडा गोशाळेत मागील तीन वर्षांपासून गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केला. याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून गोशाळा चालकास आधार मिळत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील चांगलाच फायदा होऊ लागला आहे.

माजलगाव शहरापासून एक किलोमीटर अंतर असलेल्या देवखेडा येथे सिंदफना नदीपात्राशेजारी २००९ मध्ये प.पू. कनकेश्वरी देवीच्या मार्गदर्शनाखाली व राधाकृष्णजी महाराज जोधपूरवाले यांच्या प्रेरणेने सात एकर जागेमध्ये गोशाळा उभारण्यात आली. त्यापैकी तीन एकर जागेत गायींसाठी इमारत बांधण्यात आली. सध्या याठिकाणी ३१३ गायी आहेत. गायींना लागणारा चारा व इतर खर्च पाहता ही गोशाळा चालवणे खूप जिकरीचे काम आहे; परंतु येथील काही गो-सेवक जेव्हा तोटा होईल, त्यात ते वाटा उचलतात.

दरवर्षी या गोशाळेला तोटा होत असल्याने गोशाळा चालविणाऱ्या सदस्यांच्या डोक्यात गांडूळ खतांची संकल्पना आली. या माध्यमातून आपण उत्पन्न वाढवू शकतो, असे लक्षात आल्याने या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी गांडूळ खताच्या निर्मितीस सुरुवात करण्यात आली. पाहता पाहता गांडूळ खत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होऊन त्याची विक्रीदेखील चांगल्या पद्धतीने होऊ लागली. यामुळे या प्रकल्पाला राधेय गांडूळ खत प्रकल्प, असे नाव देण्यात आले.

या ठिकाणी सध्या २४ ट्रेच्या माध्यमातून खत तयार करण्यात येतो. ५५ दिवसांत २४ टन गांडूळ खत तयार होतो. या खताला टनाला ८ हजार रुपयांचा भाव मिळू लागला. या खताला पश्चिम महाराष्ट्रातून चांगली मागणी येऊ लागली.

या गांडूळ खतासोबतच हा खत तयार करताना त्यातून वर्मीवाॅश हे काढण्यात येते. हे वर्मीवाॅश गांडुळाच्या मूत्रापासून मिळते. एका ट्रेला ५०-५५ लिटर वर्मीवॉश निघते. हे वर्मीवॉश शेतकरी फळबाग व इतर पिकांवर फवारणीसाठी घेऊन जातात. या वर्मीवॉशलादेखील चांगला भाव मिळू लागला असल्याची माहिती येथील गोसेवक कल्याण गुंजकर यांनी दिली.

------

खतात १०० टक्के बॅक्टेरिया असल्याने

शेतात गांडूळ खत टाकल्यास शेत भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. यामुळे या शेतातील पिकांना इतर खते टाकायची गरज पडत नाही. यामुळे पीकही जोमात येऊन उत्पन्न चांगले मिळते.

-सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव

.....

या गोशाळेला अनेक जण गुप्तपणाने चारा पाठवत असतात, तर अनेक जण आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च करून गोशाळेला मदत करतात. यामुळे ही गोशाळा सुरुवातीस ‘ना नफा, ना तोटा...’ या तत्त्वावर चालत असे; परंतु कालांतराने गायींची संख्या वाढल्याने खर्च वाढला. यामुळे दरवर्षी तोटा होऊ लागला. यामुळे आम्ही गांडूळ खताची निर्मिती सुरू केली.

-राजगोपाल ऊर्फ मुन्ना बाहेती, व्यवस्थापक

...

गोशाळेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या गांडूळ खताला पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तरीही आम्ही हे खत केवळ तालुक्यातील शेतकऱ्यांना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

-जुगलकिशोर भुतडा, अध्यक्ष, कमलबाई रामनिवास मुंदडा गोशाळा, देवखेडा