शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत रिक्षातच महिलेची केली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:14 IST

अंबाजोगाई : प्रसुतीसाठी रिक्षातून महिलेला नेण्यात येत होते. घर ते रूग्णालय हा दीड तासांचा खडतर प्रवास होता. त्यातच महिलेला होणाºया असह्य वेदना. अशा संकटाचा सामना करीत रुग्ण महिला अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच वेदना असह्य होत असल्याने तिच्या विव्हळण्याचा आवाज महिला डॉक्टरांच्या कानावर पडला. डॉक्टरांनीही कसलीही तमा न बाळगता थेट रिक्षाकडे धाव घेत अडचणीत सापडलेल्या त्या महिलेची प्रसुती रिक्षातच करून तिला दिलासा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : प्रसुतीसाठी रिक्षातून महिलेला नेण्यात येत होते. घर ते रूग्णालय हा दीड तासांचा खडतर प्रवास होता. त्यातच महिलेला होणाºया असह्य वेदना. अशा संकटाचा सामना करीत रुग्ण महिला अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच वेदना असह्य होत असल्याने तिच्या विव्हळण्याचा आवाज महिला डॉक्टरांच्या कानावर पडला. डॉक्टरांनीही कसलीही तमा न बाळगता थेट रिक्षाकडे धाव घेत अडचणीत सापडलेल्या त्या महिलेची प्रसुती रिक्षातच करून तिला दिलासा दिला.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय सामान्य रुग्णांचे आधारस्थान आहे. शनिवारी होळ येथील एक महिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने प्रसुतीसाठी होळ येथून अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयाकडे रिक्षातून निघाली. रिक्षा होळ येथून ११.३० वाजता निघाला. रस्त्यावरील खड्डे, राज्य रस्त्याचे सुरू असलेले काम अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत दीड तासानंतर १५ कि.मी. चे अंतर पार करत रिक्षा रुग्णालय परिसरात आला. रिक्षातील रुग्ण महिला प्रसुतीच्या असह्य वेदनांनी विव्हळत होती. तिला रुग्ण कक्षात घेऊन जाणेही अवघड काम होते.

वेदना वाढतच होत्या. त्यामुळे ती जोरजोरात विव्हळत होती. तिच्या विव्हळण्याचा आवाज स्त्रीरोग विभागातील निवासी डॉ. मिताली गोलेच्छा यांनी ऐकला व त्यांनी तात्काळ रिक्षाकडे धाव घेतली. रिक्षात असलेल्या महिलेची स्थिती पाहून त्यांना त्या महिलेच्या प्रसुतीबाबतची पूर्ण जाणीव झाली. प्रसंगावधान ओळखून त्यांनी आजूबाजूच्या महिला व परिचारिकांना तत्काळ बोलावत त्या महिलेची प्रसुती रिक्षातच केली. नंतर तिला महिला रुग्णकक्षात दाखल करण्यात आले.

या मातेने मुलीला जन्म दिला असून, जन्मलेली मुलगीही गुबगुबीत आहे. स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखविलेल्या या तत्पर सेवेबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी डॉ. मिताली गोलेच्छा व सहकाºयांचे स्वागत केले.

तात्काळ उपचार मिळाल्याने समाधानस्वा. रा. ती. रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या होळ येथील त्या महिलेची अवस्था खडतर रस्त्याच्या आदळ्यामुळे गंभीर झाली होती. अशा स्थितीत होणारी प्रसुती अत्यंत गुंतागुंतीची ठरते. मात्र, स्त्री रोग विभागाच्या निवासी अधिकारी डॉ. मिताली गोलेच्छा यांनी तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध करून दिल्याने त्या महिलेची गुंतागुंत टळली व पुढील उपचार सोयीस्कर ठरले. अशी माहिती स्त्रीरोग विभागाचे प्रा. डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.