शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत ‘वुमेन वॉरिअर्स’ ऑन ड्युटी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आई, पत्नी म्हणून येणारी कर्तव्ये त्यांना बाजूला सारता येत नाहीत. पुरुषांपेक्षा अधिक वेळ कुटुंबाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : आई, पत्नी म्हणून येणारी कर्तव्ये त्यांना बाजूला सारता येत नाहीत. पुरुषांपेक्षा अधिक वेळ कुटुंबाला द्यावाच लागतो. रात्री घरी परतण्याची वेळ निश्चित नसते. बऱ्याचदा रात्रपाळीतही काम करावे लागते. अशावेळी मुलांना आईची उणीव जाणवते. तरीही मुलांच्या हट्टाला मुरड घालून पोलीस खात्यातील ‘वुमेन वॉरिअर्स’ लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत आपले कर्तव्य बजावून आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी पेलताना दिसत आहेत.

कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीसही फ्रंटलाईन वॉरिअर म्हणून लढत आहेत. यात महिला पोलिसांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. प्रतिबंधित क्षेत्रात शांतता राखण्यापासून ते पोलीस ठाण्यातील इतर कामकाज सांभाळण्यापर्यंत महिला पोलीस जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची उकल करण्यात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. पुरुष कर्मचाऱ्यांइतकाच कामाचा ताण महिला पोलिसांवरदेखील असतो. अशा स्थितीत अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मुले पाच ते सात वर्षे वयोगटातील आहेत. या चिमुकल्यांचा आग्रह आईने घरीच थांबावे, आपण तिच्या ‌अवतीभोवतीच खेळत राहावे, असा असतो. कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचीदेखील आपल्या मुलांसाठी घालमेल होते. मात्र, मायेचा हात फिरवून मुलांची समजूत घालावी लागते. त्याचसोबत या कोवळ्या वयात त्यांना परिस्थितीची जाणीवदेखील करून द्यावी लागत आहे. त्यानंतर कोरोना आणि पोलीस प्रशासनावरील ताण ही बाब एकदा मुलांच्या लक्षात आली की, आपण या परिस्थितीमध्ये समाजासाठी काहीतरी वेगळे काम करत योगदान देत असल्याचा अभिमान वाटतो, अशा प्रतिक्रिया महिला पोलिसांनी दिल्या.

दोघे जण ड्युटीवर असल्यामुळे मुलांचा सांभाळ करताना कसरत करावी लागते. मुले सतत आई ‘तु लवकर घरी ये’ अशी विनवणी फोन करून करतात. मात्र, सध्या कोरोनामुळे ड्युटीवर जाताना ते मास्क, सॅनिटायझर याचीही आठवण करून देतात. कधी-कधी शेजाऱ्यांना मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी विनंती करावी लागते.

- राधा शिंदे

.....

ड्युटीवर असताना मुलांना वेळ देणे शक्य होत नाही. काही काळ मुलांचा सांभाळ पती करतात. पोलीस लाईनमध्ये राहात असल्यामुळे मुलांची चिंता कमी वाटते. मात्र, सतत आठवण आल्याने ते फोन करतात किंवा आपल्याला विचारावे लागते काय सुरू आहे. जेवण केले का? काळजी घ्या, भांडण करू नका. त्यामुळे चिंता कमी वाटते.

- ज्योती कांबळे

.....

महिला पोलीस म्हणून काम करताना पत्नी, आई या जबाबदाऱ्यादेखील पार पाडाव्याच लागतात. इतर महिलांप्रमाणे चूल अन् मुल हे विश्व आमचे नाही. मात्र, याचा अभिमानदेखील आम्हाला आहे. मुलांकडे थोडेफार दुर्लक्ष होते. मात्र, त्यांनादेखील परिस्थिती माहिती असल्यामुळे ती चांगला प्रतिसाद देतात.

- भाग्यश्री खांडेकर

.....

मुलांच्या शाळा सुरू असल्यानंतर त्यांचा वेळ शाळेत जातो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ते घरीच आहेत. मग ड्युटीवर आल्यानंतर त्यांची काळजी वाटते. मात्र, कर्तव्य बजावणेदेखील गरजेचे आहे. याची जाणीव मुलांना करून दिल्यावर ते समजून घेतात.

- मेहेर सिराज सय्यद

....

मुलांच्या प्रतिक्रिया...

आई ड्युटीवर जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी सांगून जाते. पण कोरोनाच्या काळात तिच्या कामाची वेळ वाढली आहे. त्यामुळे ती लवकर घरी यावी, असे नेहमी वाटते. आठवण आल्यानंतर फोन करून तिच्याशी बोलतो, कधीतरी ती घरी लवकर आल्यावर मला आनंद होतो.

-अझिफ शेख

....

आई पोलीस म्हणून काम करते. वडील पण ड्युटीवर असतात, साप्ताहिक सुटी असेल त्याचदिवशी पूर्ण दिवस आई किंवा बाबांसोबत यापैकी एकासोबत असतो. इतर वेळी नेहमी धावपळ असल्याचे दिसून येते. शाळा बंद असल्यामुळे आम्हाला जास्तच आठवण येते.

- हर्श दुधाळ

.....

आमची आई कर्तव्यावर जाते. इतरांप्रमाणे आई दिवसभर आमच्यासमोर असावी अशी इच्छा असते. पण तसे तिची साप्ताहिक सुटी असेल त्याच दिवशी होते. आठवण आली तर फोन करून बोलते. लवकर ये... काळजी घे... म्हणून पण सांगतो.

-अविका बरकडे

....

आई-बाबा दोघेही घराबाहेर असताना नेहमी त्यांची आठवण येते. मग फोन करून त्यांच्यासोबत बोलतो. त्यानंतर मित्रांसोबत घराच्या परिसरात खेळतो. कोरोनाच्या काळात आई करीत असलेल्या कामाची भीती वाटते तसेच अभिमानदेखील वाटतो.

-शौर्य सारणीकर.