शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयावर महिलांचा बहिष्कार? एखंडे प्रकरणानंतर माजलगावात महिलांची ग्रामीण रुग्णालयाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:34 IST

ग्रामीण रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घसरली आहे. 

- पुरुषोत्तम करवा 

माजलगाव (जि. बीड) : येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतिदरम्यान मीरा एखंडे व त्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर महिलांनी या रूग्णालयाकडे अक्षरश: पाठ फिरविली आहे. ग्रामीण रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घसरली आहे. 

येथील ग्रामीण रुग्णालयालयात डिसेंबर २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात मीरा एखंडे या प्रसुतीसाठी आल्या होत्या. प्रसुतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा व बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांवर आरोप झाले. हे प्रकरण राज्यभरात गाजले. या घटनेचा परिणाम ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरोदर महिलांवर झाला आहे.

याआधी या रुग्णालयामध्ये प्रत्येक महिन्याला १५० ते २०० प्रसुती व्हायच्या. डिसेंबर २०१८ मध्ये १५८ महिलांची प्रसुती झाली होती. त्यात ३५ महिलांचे सिझेरियन झाले. मात्र या घटनेनंतर जानेवारी महिन्यात रूग्णालयात केवळ ६३ प्रसुती झाल्या. त्यात ८ सिझेरियन आॅपरेशन झाले. पुढे फेब्रुवारी महिन्यात ही संख्या आणखी घटून ५७ वर आली. त्यात एकही सिझेरियन झाले नाही. एखंडे प्रकरणानंतर महिलांनी ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी पाठ फिरवली आहे. संबंधित विभागात तज्ज्ञांची कमी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका न घेता थेट बीडला रेफर केले जात असल्याची माहिती समोर रूग्णांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितली.

रूग्णांना आर्थिक भुर्दंडगरोदर महिलांची परिस्थिती गंभीर असल्यास खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडाला देखील सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात पुरेशा तज्ज्ञांची नियुक्ती करुन तसेच साहित्य पुरवठा करून रुग्णांची लूट थांबविण्याची मागणी होत आहे.

सात मुलींनंतर मुलगा झाला पण...मीरा एखंडे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर सायंकाळी प्रसुतीकळा वाढल्यानंतर डॉक्टरांनी प्रसुतीसाठी घेऊन गेले असता रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या पतीकडून कागदपत्रांवर सह्या घेतल्या व प्रसुती लवकरच होईल, असे सांगितले. तोपर्यंत बाळ पोटामध्येच  दगावले. त्यानंतर लगेचच मीरा यांचादेखील मृत्यू झाला. डॉक्टरांनी रात्री नातेवाईकांना विचारात न घेता शवविच्छेदन केले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या विरोधात नातेवाईकांनी तक्र ार केली. यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांना येथून हलवले. मीरा एखंडे यांची ही आठवी प्रसुती होती. यापूर्वी त्यांना सात मुली होत्या. आठवा मुलगा झाला, पण तो वाचू शकला नाही.

औषधी आणावी लागते बाहेरूनप्रसुतीसाठी आलेल्या बहुतांश महिला गरीब असतात. उपचारासाठी लागणारी औषधी अनेक वेळा बाहेरून आणण्यास सांगितली जाते. ही औषधी रुग्णालयामार्फतच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. 

विभाग लवकरच पूर्ववत होईल प्रसुती विभागात वरिष्ठ पातळीवरून स्त्रीरोग तज्ञ व भूल तज्ज्ञ यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. या माध्यमातून प्रसूती विभाग लवकरच पूर्ववत होईल. - डॉ. गजानन रुद्रावर, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिलाdoctorडॉक्टर