शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना महिलांनी दिला चप्पलेने चोप; शर्ट काढून रस्ता करायला लावला साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 17:36 IST

आक्रमक झालेल्या महिला पाहून गाडीतून उतरून वाहनचालकांनी राखेचे ढीग उचलून रस्ता स्वच्छ केला तेव्हाच त्यांच्या गाड्या तेथून पुढे जाऊ शकल्या. 

ठळक मुद्देरस्त्यावर राखेचे ढीग साचल्याने परिसरात प्रदूषण वाढले आहेदररोज 200 हायवा गाड्यातून राखेची वाहतूक

- संजय खाकरे

परळी : हायवा टिप्पर गाड्यातील राख रस्त्यावर पडून प्रदूषण होत असल्याने शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. शुक्रवारी सकाळी राखेच्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या पांगरी कॅम्प येथील रणरागिणी महिलांनी राखेच्या गाड्या अडवून वाहनचालकांना चांगलाच चोप दिला. यानंतर वाहनचालकांना चक्क रस्ता साफ करायला लावला. आक्रमक झालेल्या महिला पाहून गाडीतून उतरून वाहनचालकांनी राखेचे ढीग उचलून रस्ता स्वच्छ केला तेव्हाच त्यांच्या गाड्या तेथून पुढे जाऊ शकल्या. 

शुक्रवारी सकाळी या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. परळी -बीड रस्त्यावर पांगरी हे गाव आहे या मार्गाने पंधरा मिनिटाला 25 हायवा राखेची वाहतूक केली जात आहे. तर 25 रिकाम्या हायवा गाड्या येत आहेत. यातील राख रस्त्यावर पडत आहे. राखेच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे परळी-पांगरी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दुचाकी वाहन चालविणे अशक्य झाले आहे. यास कंटाळून शुक्रवारी सकाळी पांगरी रस्त्यावर या भागातील दोन महिला व इतर पाच पुरुष आले आणि त्यांनी राखेची वाहने अडवली .वाहन चालकाला गाडीतून खाली उतरविले व रस्त्यावर पडलेले राखेचे ढीग स्वच्छ करून घेतले अंगावरील शर्ट काढून शर्ट ने ही रस्ता स्वच्छ करायला लावला. 

दररोज 200 हायवा गाड्यातून राखेची वाहतूकपरळी तालुक्यातील वडगाव दादाहारी ,दाऊतपुर शिवारात औष्णिक विद्युत केंद्राचे राख तळे आहे. येथून दररोज 200 हायवा गाडी राख भरून विक्रीसाठी व्यवसायिक घेवून जातात. राखेची वाहतूक परळीच्या चार ही दिशेने होत असल्याने सर्वच भागातील नागरिक राख प्रदूषणाला कंटाळले आहेत. या प्रश्नी दादाहरी वडगाव च्या ग्रामस्थांनी दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केले .ऊर्जामंत्री, मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले ,चर्चा केली. काही दिवसापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राख वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. तरीही राखे वाहतूक बंद होण्याऐवजी जोरात सुरू आहे. 

राखेच्या प्रदूषणाने आरोग्य धोक्यात परळी शहरातूनही राखेची वाहतूक केली जात असल्याने प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बीड ,नगर ,लातूर परभणी जिल्ह्यात विट भट्टी साठी राख विक्री केली जात आहे. परळी -बीड मार्गावर असलेल्या तळेगाव, टोकवाडी ,पांगरी, लिंबोटा, रेवली वडखेल, सीरसाळा तसेच नागापूर, डाबी बहादूरवाडी व परळी- गंगाखेड रोडवरील दादाहारी वडगाव ,दाऊतपुर या ठिकाणचे ग्रामस्थ व शहरातील नागरिक रस्त्यावरून हायवा टिप्पर राख सांडत जात असल्याने त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर पडलेली राख हवेने उडून नागरिकांच्या घरात ,दुकानात जात आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत असून श्वसन व डोळ्याचे विकार जडत आहेत.

परळी -पांगरी रस्त्यावर होणारे राखेचे प्रदूषण रोखावे यासाठी स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले, पण प्रशासनाने काही कारवाई केली नाही, नागरिकांना नाईलाजाने हातात कायदा घ्यावा लागत आहे. प्रशासनाने राख वाहतूक करणाऱ्यांना नियम करावे.- नंदकिशोर मुंडे, सामाजिक कार्यकर्ते 

पांगरी येथे महिलांनी राख वाहतूक चालकांना चोप दिला याचा आदर्श परळी शहरातील लोकांनी व अन्य ठिकाणच्या लोकांनी घेऊन राख माफियांना धडा शिकवावा, प्रशासन काही कारवाई करत नसल्याने नागरिकांना अशी कारवाई करण्याची वेळ आली आहे.- शिवाजी शिंदे, माजी सरपंच, दादाहारी वडगाव

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी