शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राखेच्या वाहनचालकांना महिलांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

परळी : हायवा टिप्पर गाड्यातील राख रस्त्यावर पडून प्रदूषण होत असल्याने शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण ...

परळी : हायवा टिप्पर गाड्यातील राख रस्त्यावर पडून प्रदूषण होत असल्याने शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. शुक्रवारी सकाळी राखेच्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या पांगरी कॅम्प येथील रणरागिनींनी राख वाहून नेणारी वाहने अडवून हातात चप्पल घेऊन वाहनचालकांना चांगलाच चोप दिला तसेच रस्ता साफ करायला लावला. महिलांचा रुद्रावतार पाहून वाहनातून उतरून चालकांनी साचलेले राखेचे ढीग उचलून रस्ता स्वच्छ केला. त्यानंतरच वाहने सोडण्यात आली. शुक्रवारी सकाळी या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

परळी-बीड रस्त्यावर पांगरी हे गाव आहे, या मार्गाने पंधरा मिनिटांला २५ हायवाद्वारे राखेची वाहतूक होत आहे, तर २५ हायवा रिकाम्या जातात. यातील राख रस्त्यावर पडते. राखेच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे परळी पांगरी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना दुचाकी चालविणे अशक्य झाल्याने शुक्रवारी सकाळी पांगरी रस्त्यावर या भागातील दोन महिला व इतर पाच पुरुषांनी राखेची वाहने अडवली. वाहनचालकाला गाडीतून खाली उतरविले व रस्त्यावर पडलेले राखेचे ढीग स्वच्छ करून घेतले अंगावरील सदरा काढून रस्ता स्वच्छ करायला लावला. रस्ता स्वच्छ केल्यानंतरच वाहनांना सोडण्यात आले.

--------

प्रशासनाचे दुर्लक्ष

परळी-पांगरी रस्त्यावर होणारे राखेचे प्रदूषण रोखावे यासाठी स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले होेते. पण प्रशासनाने काही कारवाई केली नाही, नागरिकांना नाईलाजाने हातात कायदा घ्यावा लागत आहे. प्रशासनाने राख वाहतूक करणाऱ्यांना नियम करावे.

- नंदकिशोर मुंडे, पांगरी, ता.परळी

----------

नागरिकांचा संताप

पांगरी येथे महिलांनी राख वाहतूक चालकांना चोप दिला याचा आदर्श परळी शहरातील लोकांनी व अन्य ठिकाणच्या लोकांनी घेऊन राख माफियांना धडा शिकवावा. प्रशासन काही कारवाई करत नसल्याने नागरिकांना अशी कारवाई करण्याची वेळ आली आहे.

- शिवाजी शिंदे, माजी सरपंच, दादाहारी वडगाव, ता. परळी

--------

===Photopath===

250621\img-20210625-wa0395_14.jpg~250621\screenshot_2021-06-25-14-39-13-47_14.jpg