बीड: जिल्ह्यात गुन्ह्याचा आलेख वाढतच चालला असून गेल्या वर्षात तब्बल ७९ खून झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पोलिसांचा ग्रामीण भागात धाक कमी झाला म्हणून की काय २०१३ या वर्षी बलात्काराच्या ९२ घटना घडल्या आहेत़ आष्टी तालुक्यातील संजय गायकवाड याला भर दिवसा गोळ्या घालून ठार मारण्यात आले़ अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर भितीचे सावट कायम असल्याचा नागरिक खाजगीत सांगत आहेत़ २०१३ या साली जिल्ह्यात खून झाल्याच्या ७९ घटना घडल्या आहेत़ पोलिसांचा धाक असेल तर गुन्ह्यांची संख्या निश्चित कमी होते असा दावा खुद्द पोलिस अधिकारीही करतात मात्र यंत्रणेमधील अधिकार्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले नाही तर क्राईमवर कंट्रोल करणे हे आवाक्याबाहेर जाते़ गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १९ ठिकाणी दरोड्याच्या घटना घडल्या आहेत तर ६१८ चोरीच्या घटना झाल्या आहेत़ खुनाचा प्रयत्न झाल्याच्या ८३ तर जबरी चोरीच्या १०५ घटना झाल्या आहेत़ गंभीर गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता त्यांची संख्या ५० च्या पुढे आहे़ मारामारीच्या ३७८ घटना घडल्या आहेत़ दरोडा, चोरीच्या घटना वाढल्या गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी दरोडे व लहान मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ उन्ह्यात नागरिक लग्न समारंभासाठी जात असल्याचे पाहत चोरटे नागरिकांचे घर साफ करत आहेत़ शहरातील चक्रधर नगर भागात चोरट्यांनी हात साफ करत घरातील १५ तोळे सोने चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली आहे़ कोणत्या ना कोणत्या ठिकाणी दरोडा किंवा चोरीच्या घटना घडतच चालल्या आहेत़ साई नगर-काकीनाडा या एक्सप्रेसमध्ये चार जणांना दरोडा टाकल्याची घटना ताजीच आहे़ लुटण्यात आलेल्या महिला प्रवासी गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या होत्या. मात्र भाषेच्या समस्येमुळे गुन्हा दाखल करणे पोलिसांना शक्य झाले नाही़ या रेल्वेतील जवळपास पंधरा महिलांची लूट झाली होती मात्र प्रवासी महिलांचे संपर्क क्रमांक नसल्याचे दोन महिलांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हे चोरटे कोणत्या भागातील होते हे त्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होईल मात्र गुन्ह्यांच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे़ वाढत्या गुन्ह्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने या गुन्ह्यांना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़ दिवसाढवळ्या मारामारी व खून यांच्यामुळे नागरिकांवर भीतीचे सावट कायम आहे़ अशा परिस्थितीत पोलिसांनी नागरिकांना कारवाईच्या माध्यमातून दिलासा देणे आवश्यक ठरते़ गुन्हेगारीचा आलेख वाढतच गेला तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल यात शंका नाही़(प्रतिनिधी) २०१३ मधील गुन्ह्यांची संख्या गुन्ह्याचा प्रकार संख्या खून ७९ बलात्कार ९२ खुनाचा प्रयत्न ८३ दरोडा १९ जबरी चोरी १०५ घरफोडी २१४ चोरी ७१८ मारामारी ३७८
बलात्कार, खुनाच्या घटना वाढत असल्याने महिला भयभीत
By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST