तालुक्यातील शिरपुरा येथील वसंत लक्ष्मण घुले (वय ५५) व त्यांची पत्नी चंद्रकला वसंत घुले (वय ५०) हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. ४४ एम. १९६८) लाडेवडगाव येथून होळमार्गे गावाकडे निघाले होते. ते अंबाजोगाई रस्त्याने केजकडे येताना चंदनसावरगाव येथील बस थांब्याजवळ अंबाजोगाईहून केजकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चंद्रकला वसंत घुले (वय ५०) ही महिला जागीच ठार झाली. दुचाकीला धडक देत चालक वाहनासह फरार झाला. ही घटना २० जानेवारी सकाळी ७ वाजता घडली. वसंत लक्ष्मण घुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार भागवत कांदे हे पुढील तपास करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST