शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हातावर पोट असणारे वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:33 IST

अंबेजोगाई : लॉकडाऊनमुळे वेगवेगळे कलावंत, बँडवादक, वेटर, फोटोग्राफर यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने जाहीर केलेली मदतही तोकडी आहे. ...

अंबेजोगाई : लॉकडाऊनमुळे वेगवेगळे कलावंत, बँडवादक, वेटर, फोटोग्राफर यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने जाहीर केलेली मदतही तोकडी आहे. पोटाची खळगी भरायची कशी, असा सवाल हे लोक करत आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक व्यवसाय कोलमडले आहेत. परिणामी, घरात बसून डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर फेडायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन तीन महिने सुरू झाले. यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला. त्यानंतर, व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले. बाजारात आर्थिक मंदी निर्माण झाली. परिणामी, दुकानात, विविध व्यवसायांत काम करणाऱ्या अनेक कामगारांना काढण्यात आल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. हॉटेल व्यवसाय बंद राहिल्याने व ग्राहकांनीही या व्यवसायाकडे पाठ फिरविली. त्यामुळे अनेक वेटर बेरोजगार झाले. त्यातच अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. रुग्णालयातील हजारोंच्या बिलाने अनेकांचे कंबरडे मोडले. कमाई नाही अन्‌ खर्च मात्र मोठा, अशी स्थिती अनेक कुटुंबाची झाली. गावोगावच्या यात्रा बंद झाल्याने अनेक कलावंत बेरोजगार झाले, तर गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालये बंद राहिली. बँडपथक बंद राहिले, तर हलगी, जागरण गोंधळ व विविध कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंडपवाले, मंगलसेवा यांचे व्यवसाय ही पूर्ण कोलमडले. व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते ही भरणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. या सर्व व्यावसायिकांना आपल्याकडे कामासाठी असणारे माणसं सांभाळने मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. तर फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत.

....

आर्थिक पाठबळ देण्याची गरज

लॉकडाऊनच्या स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने अनेक घटकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यात अजूनही अनेक घटक उपेक्षित राहिले आहेत. अशा सर्व घटकांना न्याय देऊन व त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाणे यांनी केली आहे.

....