शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'आता शेती कराव की मराव'; ७२० किलो डाळींब विक्रीतून आले केवळ २३३ रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 18:41 IST

पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली.

- नितीन कांबळे 

कडा : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर बागा बहरल्या आहेत. अतिवृष्टीतही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागांची निगा राखल्याने फळ चांगली आहेत. मात्र, दर गडगडल्याने ७२० किलो डाळींबाची विक्री करून केवळ २३३ रुपये हाती आल्याने देवळाली येथील शेतकऱ्याने व्यथित मनाने 'शेती कराव की मराव' अशा भावना व्यक्त करत गावाची वाट धरली. 

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावची ओळख तशी पानमळ्याची आहे. पण पाणी नसल्याने पानमळे नामशेष झाली आणि आता फळबागाची मोठ्या प्रमाणावर लागवड असलेले गाव आहे. या गावातील रमेश डोके या सुशिक्षित शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी डाळींब तोडणी केली. यातील ७२० किलो डाळींब ३६ कॅरेटमध्ये घेऊन विक्रीसाठी ते सोलापूरच्या बाजारपेठेत गेले. येथे डाळींब विक्रीतून त्यांना 3933 रुपये मिळाले मात्र यातून 3000  रु गाडीभाडे, मापाडी हमाली 701 असे वजा होऊन केवळ 233 रूपयेच हाती आले. जीवाचे रान करून मोठ्या आशेने जपलेल्या डाळींबाच्या विक्रीतून तुटपुंजी रक्कम आल्याने खाली मान घालत डोळ्यातले पाणी व हुंदके लपवत डोके यांनी घराचा रस्ता धरला. पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली. पण फळाला योग्य भाव नसल्याने डोके यांना आर्थिक संकट दिसत आहे. यातूनच त्यांनी आता शेती कराव की मरव अशी व्यथा व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती