शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी पत्नीचा खून; पतीला १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:53 IST

: हुंड्यासाठी पत्नीचा छळ करीत तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीस १० वर्षांचा सश्रम कारावास व सासू सासऱ्यास दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देनिकाल : बीड तालुक्यातील पिंपरगव्हाणचे प्रकरण

बीड : हुंड्यासाठी पत्नीचा छळ करीत तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीस १० वर्षांचा सश्रम कारावास व सासू सासऱ्यास दोन वर्षांची शिक्षा सुनावली. हा निकाल बीडच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी दिला. बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली.छाया गोरख आगम (रा. पिंपरगव्हाण) असे मयताचे नाव होते. ३ एप्रिल २०१७ रोजी छाया घरात एकटीच होती. रात्रीच्या सुमारास पतीने जमिनीच्या व वडिलांच्या नावावरील प्लॉट माझ्या नावावर करुन दे असे म्हणत तिला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. तसेच सासरा दादासाहेब व सासू रामकंवर यांनीही तिचा छळ केल्याची फिर्याद छायाचे वडील दिनकर मनोहर घोलप यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. ग्रामीण ठाण्याचे तत्कालीन सहायक पो.नि. जी. एन. पठाण यांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सत्र न्या. क्रमांक ३ यु. टी. पौळ यांनी सदर प्रकरणात पुरावे व जबाब ग्राह्य धरुन आरोपी पती गोरख यास कलम ३०४ ब भादंवि मध्ये दोषी धरुन १० वर्षे सश्रम कारावास व हजार रुपये दंड तसेच सासू रामकंवर व सासरा दादासाहेब यांना छळ केल्याप्रकरणी कलम ४९८ अ अंतर्गत दोन वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून ठाकूर यांनी सहकार्य केले.वडील व मित्राचा जबाब ठरला महत्त्वपूर्णप्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. छायाचे वडील दिनकर घोलप व लग्न जमवताना बैठकीत असणारा त्यांच्या मित्राचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. बैठकीत तीन लोक होते. दोघांचा जबाब घेतला. एक फितूर झाला.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय