शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:54 IST

गेवराई तालुक्यातील जातेगांव येथील विवाहिता कविता भरत पवार हिचा खून केल्या प्रकरणी तिचा पती भरत ताराचंद पवार यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी सुनावली.

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : माहेरुन पैसे आणण्यासाठी होत होता विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई तालुक्यातील जातेगांव येथील विवाहिता कविता भरत पवार हिचा खून केल्या प्रकरणी तिचा पती भरत ताराचंद पवार यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी सुनावली.माजलगाव तालुक्यातील जामगातांडा येथील गोविंद गंपु राठोड यांची मुलगी कविताचा विवाह जातेगाव येथील भरत पवार याच्याशी २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर कविताला तीन ते चार महिने सासरच्यांकडून चांगल्या पध्दतीने नांदविले. त्यानंतर मात्र माहेरहून २ लाख आणण्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. हा सर्व प्रक ार कविताच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी जावई भरतकडे जाऊन त्याला समजावून सांगितले. मात्र सासरच्यांक डून कविताला त्रास सुरुच होता. दरम्यान २७ नोव्हेंबर २०१६ रोजी जातेगाव शिवारातील यमाई देवीच्या शेतामध्ये कविताचा धारदार चाकूने गळा कापून खून करण्यात आला. त्यानंतर भरत याने स्वत:च्या अंगावरदेखील चाकूने जखम केली. हा प्रकार भरतचे वडील ताराचंद पवार यांनी पाहिल्यानंतर मयत सून कविता व मुलगा भरत यास गावातील कोकाटे यांच्या जीपमधून बीड येथील रुग्णालयात घेऊन आले. मात्र दवाखान्यात आणण्यापूर्वीच कविताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन व इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला.याप्रकरणी गोविंद राठोड यांच्या फिर्यादीवरुन कविताचा पती भरत, सासरा ताराचंद, दीर शरद व त्याची पत्नी सविता पवार विरोधात, खून केल्याप्रकरणी व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सपोनि हुंबे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.१५ साक्षीदार तपासले : सादर झालेल्या पुराव्यांचे अवलोकनयाप्रकरणाची सुनावणी अति.जिल्हा व सत्र न्या. - १ यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय पुरावा, परिस्थितीजन्य पुराव्याचे अवलोकन करुन व सरकारी वकील अ‍ॅड.राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या. बी.व्ही. वाघ यांनी आरोपी भरत पवार यास जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड. राम बिरंगळ यांना अ‍ॅड.अमित हसेगांवकर, अजय राख, अनिल तिडके, बी.एस. राख, एस.व्हि सुलाखे, आर.पी. उदार, पी.एन. मस्कर व पैरवी अधिकारी बिनवडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCourtन्यायालयOrder orderआदेश केणे