शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कत्तीने वार करून हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:31 IST

या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपरळी तालुक्यातील बोधेगाव येथील घटनाधारदार कत्तीने गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले.

सिरसाळा : हात मोडल्याने पत्नी दोन महिन्यांपासून माहेरी थांबली होती. तिला सासरी बोलावूनदेखील येत नव्हती. याचा राग मनात धरत तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर कत्तीने सपासप वार केले व पत्नीची हत्या केली.  त्यानंतर स्वतः विषारी द्रव प्राशन केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ही घटना परळी तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी दुपारी घडली. 

ज्ञानेश्वरी धनराज ऊर्फ योगीराज सोनवर (२७, रा. होळ, ता. केज) असे त्या मृत पत्नीचे नाव आहे. परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह सहा वर्षांपूर्वी होळ येथील धनराज ऊर्फ योगीराज वनराज सोनवर याच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक ५ वर्षांची मुलगी  आणि ३ वर्षांचा एक मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि धनराज औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तिथे दोन महिन्यांपूर्वी पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वरीचा हात मोडला. त्यानंतर ती राहण्यासाठी बोधेगावला माहेरी घरी आली होती. 

सोमवारी दुपारी धनराज बोधेगावला आला. सासुरवाडीत ज्ञानेश्वरीचा भाऊ वैजनाथने धनराज सोबत जेवण केले आणि शेळ्या चारण्यासाठी निघून गेला. दुपारी ४ वाजता धनराज पुन्हा सासुरवाडीच्या घरी आला. सासरी नांदण्यास का येत नाहीस, असे म्हणत त्याने चारित्र्यावर संशय घेत ज्ञानेश्वरीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रागात धनराजने धारदार कत्तीने ज्ञानेश्वरीच्या गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानेश्वरीची बहीण कल्पना शामराव सोडगीर यांच्या फिर्यादीवरून धनराज सोनवर याच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक डोंगरे करीत आहेत.

पतीवर रुग्णालयात उपचार सुरू ज्ञानेश्वरीवर वार केल्यानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यावेळी तिची बहीण कल्पना हिने ते पाहिले व आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नातेवाईक धावत आले. यावेळी धनराजने सर्वांसमोर स्वत: आणलेल्या बाटलीतील विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी अत्यवस्थ झालेल्या धनराजला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीड