शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट कॉलर गुन्हेगारी ! दर्गाहची शंभर एकर जमीन बळकवणाऱ्या सहा उच्चशिक्षितांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 17:56 IST

Crime In Beed : रुईनालकोल येथील दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास म्हणून शंभर एकर जमीन शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देबनावट संमतीपत्र दिल्याचे उघड

कडा/आष्टी: तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमीन बनावट संमतीपदत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी आष्टी ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

रुईनालकोल येथील दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास म्हणून शंभर एकर जमीन शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबूलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जिमनीची देखभाल करतात. दरम्यान,

गोपीनाथ पांडुरंग बोडखे, शेख मुस्ताक बादशाहा पानसरे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, आजिनाथ त्र्यंबक बोडखे, संजय भाऊसाहेब नालकोल व शरद नानाभाऊ पवार यांनी संगनमत करुन खोटे, बनावट व बोगस कागदपत्र तयार केले. शेख महमंद बाबा दर्गा देवस्थानाचे नाव७/१२ अभिलेखात कब्जेदार रकान्यातून देवस्थानाचे नाव कमी करून तसेच स्वत:चे नाव लावून शंभर एकर जमिनीचा अपहार केला. ही बाब २०२० मध्ये लक्षात आल्यानंतर शेख दस्तगीर महंमद यांनी तहसीलदार, मंडळधिकारी, तलाठी, जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करुन तक्रार केली. शिवाय जिल्हा वक्फ बोर्ड याना व पोलीस विभागाला अर्ज दिले. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात जिल्हाधिकारी, भूसुधार सामान्य विभाग यांच्याकडेही तक्रार अर्ज केले. त्यानंतर सुनावणी सुरु झाली, त्यात ही बोगसगिरी चव्हाट्यावर आली.

हेही वाचा - ...तर काशीपर्यंत पदयात्रा काढून 'काशी' झाल्याचे सांगावे; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना सल्ला

शंभर रुपयांच्या बाँडवर बोगस शपथपत्रअपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण सुरु असताना १७ ऑक्टोबर २०१७ ते २०२० या कालावधीत शंभर रुपयांच्या बाँडवर बनावट संमतीपत्र तयार करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दस्तगीर महंमद शेख यांनी आष्टी ठाण्यात ३ सप्टेंबर रोजी तक्रार दिली.त्यावरुन आजिनाथ त्र्यंबक बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, (सर्व रा.आनंदवाडी), शेख मुस्ताक बादशाह पानसरे, संजय भाऊसाहेब नालकोल, शरद नानाभाऊ पवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड