शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये तूर खरेदी केंद्र कधी सुरू होणार....?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : नाफेडच्या वतीने उडीदाची खरेदी झाल्यानंतर आता तूर खरेदी केंद्र कधी सुरु होणार याची शेतकºयांना ...

ठळक मुद्देगतवर्षीच्या अनुभवानंतर पेरा घटूनही मिळाला चांगला उतारा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या वतीने उडीदाची खरेदी झाल्यानंतर आता तूर खरेदी केंद्र कधी सुरु होणार याची शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. मागील वषीचा अनुभव लक्षात घेत यंदा योग्य ती दक्षता नाफेडसह स्थानिक यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.

बीड जिल्ह्यात कापूस लागवडीकडे शेतकºयांचा वाढता कल आहे. परंतु कधी दुष्काळजन्य स्थिती तर कधी मिळणारा भाव व इतर कारणामुळे तसेच तुरीचे पीक त्या कालवधीत कमी असल्याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते. चांगला भाव मिळाल्याने गतवर्षीच्या (२०१६) खरीप हंगामात शेतकºयांनी तुरीचे पीक घेतले. ६२ हजार हेक्टरात तुरीचा पेरा झाला होता. चांगला पाऊस व पोषक वातावरणामुळे तुरीचे बंपर पीक आले. शासनाने हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरु केले. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम तसेच पोत्यांची कमतरता भासत होती. काही वेळा खरेदी बंदमुळे शेतकºयांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. तूर विकताना आलेल्या वाईट अनुभवामुळे बहुतांश शेतकरी कापसाकडे वळले. त्यामुळे २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये तुरीचा पेरा जवळपास ३५ टक्क्यांनी घटला. यंदा चांगला पाऊस असल्यामुळे तुरीचे पीक जोमात आले. हमीभावाने तूर खरेदी कधी सुरु होणार याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.नाफेडतर्फे माहिती घेण्याचे काम सुरुतूर खरेदी सुरु करण्यासाठी नाफेडमार्फत पीक पेरा व इतर माहिती घेतली जात आहे. हे सोपस्कर पार पडताच खरेदीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. साधारणत: १५ जानेवारीपासून तूर खरेदी सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या तुरीचे पीक शेतकºयांच्या घरात पडून आहे. खरेदी लवकर सुरु झाल्यास आर्थिक आधार होईल असे त्यांना वाटते.